Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : विमानतळ प्रकल्पबाधित कर्जमाफीपासून राहणार वंचित; ‘या’ अटीमुळे पुरंदरच्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येत असून भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 12, 2026 | 11:10 AM
विमानतळ प्रकल्पबाधित कर्जमाफीपासून राहणार वंचित; 'या' अटीमुळे पुरंदरच्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी

विमानतळ प्रकल्पबाधित कर्जमाफीपासून राहणार वंचित; 'या' अटीमुळे पुरंदरच्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Follow Us
Follow Us:

सासवड/संभाजी महामुनी : पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येत असून भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे. शेतकऱ्यांची संमती घेवून त्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या कल्पना, आडाखे मांडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत प्रकल्प बाधित शेतकरी शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित होताना दिसत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा परतावा या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच असल्याचे दिसत आहे.

 

मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस प्रसिद्ध करून शेतकऱ्यांच्या संमती घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या संमती घेण्यासाठी शेतकऱ्यांवरच एक मोठा डाव टाकला आहे. आणि तो म्हणजे जमिनीची संमती घेताना ती जमीन निर्वेध आणि निर्जोखमीची म्हणजे जमीन कोणत्याही बँकेकडे किंवा सावकाराकडे गहाण नसावी, संबंधित क्षेत्रावर कोणत्याही बँकेचे कर्ज नसावे अशी अट घातली आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प बाधित सातही गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची चौकशी केली आहे. सातही गावातील शेतकऱ्यांनी कोणत्या बँकेतून आणि किती कर्ज काढले आहे याची माहिती संकलित केली आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँक, सोसायटी, सहकारी बँक, पतसंस्था यांच्याकडून माहिती घेतली. तसेच ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे त्यांना प्रथम कर्ज बँकेत भरण्यास सांगून बँकेकडून कोणतेही कर्ज नसल्याचा दाखला घेतला. त्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांची संमती घेवून त्यास त्याप्रमाणे पैसे दिले.

कर्जमाफी केल्याचे दाखलेही मिळाले नाही

शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असे सांगितले. तसेच ज्यांचे मोठे कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. वास्तविक पाहता कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेचच बँकेकडून कर्जमाफी झाल्याचा दाखला तसेच ५० हजारांचे अनुदान मिळणे अपेक्षित होते. परंतु अनुदान देण्यापूर्वी नियमित कर्ज जमा करण्यास सांगितले, शेतकऱ्यांनी ते हि जमा केले. आणि दोन लाखांची कर्जमाफी केल्याचे दाखलेही मिळालेले नाही.

हे सुद्धा वाचा : मुंबई विद्यापीठात मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षण! राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राचा उपक्रम

जमीन थेट शासनाच्या नावावर होणार

हीच बाब लक्षात घेवून शासनाने सातही गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे तपशील पाहून प्रथम बँकेचे कर्ज नील करा आणि नंतरच जमीन घेण्यात येईल असे सांगितले. गुंतवणूकदार असलेल्या शेतकऱ्यांनी कोणताही विचार न करता कर्ज भरून पैसे घेतले. मात्र स्थानिक गावातील शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज भरताना परत कोणाकडून कर्ज घेवून भरायचे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे एकदा बँकेत कर्ज जमा केल्यावर शासनाच्या कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना फायदाच होणार नाही. कारण जमीन थेट शासनाच्या नावावर होणार आहे. त्यामुळे यामध्ये मूळ शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने सर्व काही बिनबोभाट सुरु आहे.

Web Title: Farmers affected by purandar airport project likely to be deprived of loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Purandar
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
4

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.