Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; पेरणीचीही झाली तयारी, पण पाऊस…

मका, कपाशी, मिरची लागवड करण्याकडे सध्या शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, अजूनही काही कोरडवाहू शेतकरी निसर्गाच्या दमदार पावसाची प्रतीक्षा करत आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 08, 2025 | 07:57 AM
पावसाची प्रतीक्षा ; पेरणीची झाली तयारी

पावसाची प्रतीक्षा ; पेरणीची झाली तयारी

Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर : राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होत आहे. तर काही भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे. अवकाळी पावसाने अजूनही जमिनीत ओल असून, यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणीही आटोपली आहे. तर काही शेतकरी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा करत असून, शेतकऱ्यांची पेरणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे.

अजिंठा परिसरातील अजिंठा अनाड, मुकपाट, बाळापूर, पिंपळदरी, सराटी, बोदवड, वसई, पानस, डिग्रस गोळेगाव, उडणगांव, अंभई, नानेगांव, हट्टी, बवली, हळदा, डकला, शिवणा अमसरी वाघेरा आदी ग्रामिण शेत शिवारातील सगळी कामे आटोपली आहेत. मात्र, अद्याप पेरणीयोग्य पावसाचे आगमन होत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. मृग नक्षत्र लागला तरी अद्यापही पावसाला सुरवात झाली नाही. मान्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याकडे बळीराजासह सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले आहे.

हेदेखील वाचा : Monsoon Alert: मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तासांत पाऊस घालणार थैमान; IMD चा अलर्ट काय?

दरम्यान, काही भागात पावसाच्या सरी कोसळत असल्याने जमिनीत ओलावा आहे. शेतकरी पेरणी करत असले तरी दमदार पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सध्या तरी शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. काही शेतकऱ्यांनी विहिरीतील मुबलक पाण्यावर खरीप हंगामाच्या पिकाच्या पेरणीस प्रारंभ केला आहे.

मका, कपाशी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

मका, कपाशी, मिरची लागवड करण्याकडे सध्या शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, अजूनही काही कोरडवाहू शेतकरी निसर्गाच्या दमदार पावसाची प्रतीक्षा करत आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहे.

राज्यभरात मुसळधार पाऊस

मागील काही दिवसांपूर्वी मुंबई, पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस झाला. पण, नंतर पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळाले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मान्सून दाखल झाला. मात्र, मान्सूनची गती अजूनही मंदावलेली असून, राज्यात 12 ते 13 जूनपासून मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

हेदेखील वाचा : Karjat News: पावसाला सुरुवात होत नाही तोच पुलाच्या कामाचे तीनतेरा; उल्हास नदीवरील पूल वाहतूकीसाठी बंद

Web Title: Farmers in sambhajinagar are still waiting for rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 07:50 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • heavy rains

संबंधित बातम्या

मामेभावाशी बोलल्याने विवाहितेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण; पतीने पत्नीला बेल्टने…
1

मामेभावाशी बोलल्याने विवाहितेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण; पतीने पत्नीला बेल्टने…

छत्रपती संभाजीनगर मध्ये हत्येचा थरार! रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या
2

छत्रपती संभाजीनगर मध्ये हत्येचा थरार! रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या

Heavy Rainfall News: अतिवृष्टीने मुलीच्या Feesचे पैसे गिळले; संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याने आयुष्य संपवलं, तर…
3

Heavy Rainfall News: अतिवृष्टीने मुलीच्या Feesचे पैसे गिळले; संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याने आयुष्य संपवलं, तर…

Maharashtra Heavy Rainfall: मराठवाडा विदर्भावर निर्सग कोपला! मुसळधार पावसामुळे मराठवाडा-विदर्भाला पुन्हा धोक्याचा इशारा
4

Maharashtra Heavy Rainfall: मराठवाडा विदर्भावर निर्सग कोपला! मुसळधार पावसामुळे मराठवाडा-विदर्भाला पुन्हा धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.