मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- सोशल मिडिया/istockphoto)
मुंबई: राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र गेल्या एक ते दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. दरम्यान मुंबईला पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईला पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस होण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसाठी पुढील तीन तास अत्यंत महत्वाचे असणार आहेत. मुंबई आणि उपनगरात पुढील काही तास जोरदार पाऊस होऊ शकतो. पावसाचा जोरड वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबईसह आणि रायगड जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस होऊ शकतो.
Raigad News : इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होणार ? भर पावसात गावकऱ्यांवर भितीचं सावट
रायगड जिल्ह्यात गेले दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार आज सकाळपासून पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हजेरी लावली आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड येथे पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचण निर्माण झाली आहे.
अवकाळी पावसाचा 200 हेक्टरवरील पिकांना फटका
ऐन उन्हाळ्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसून नुकसान झाले आहे. 117 गावांतील 604 शेतकऱ्यांच्या बागायती पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढला आहे. कृषी आणि महसूलने पंचनामेही सुरू केले आहेत.
यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झाले. यावर्षी प्रथमच मे महिन्यातील 14 दिवस पावसाचे ठरले. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी 238 मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस झाला आहे. शेतशिवारांमध्ये जिरायती पिके नसली तरी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला, फळबागांसह अन्य पिके घेतली होती. बागायती पिकेही आहेत.