Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात ‘मुंढे’ ब्रँड धडाका, सोलापुरात मात्र शांतता! आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात भेसळखोरांना अभय; एफडीए अधिकारी रजेवर

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांवर धडक कारवाई सुरू केली असताना, आषाढी यात्रेच्या तोंडावर सोलापूर आणि पंढरपूरमधील अन्न व औषध विभाग सुस्त आहे. अधिकारी रजेवर असल्याने विठ्ठल भक्तांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 29, 2026 | 06:43 PM
राज्यात ‘मुंढे’ ब्रँड धडाका, सोलापुरात मात्र शांतता! (Photo Credit- X)

राज्यात ‘मुंढे’ ब्रँड धडाका, सोलापुरात मात्र शांतता! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • राज्यात ‘मुंढे’ ब्रँड धडाका, सोलापुरात मात्र शांतता!
  • आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात भेसळखोरांना अभय
  • एफडीए अधिकारी रजेवर
शिवाजी हळणवर | पंढरपूर: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळखोरा विरोधात धडक मोहीम उघडली असून अवघ्या ३ दिवसात 53 धाडी टाकत 34 ठिकाणी कारवाई करण्यात आली तब्बल 33 जणांना बेड्या ठोकत मुंडेंनी ‘भेसळखोरांना थारा नाही’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. मात्र राज्यभर कारवाईचा धडाका सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील अन्नभेसळ विभागाची भूमिका समस्यास्पद असल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. राज्यात अन्न भेसळ माफियांविरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाईचा सपाटा लावला असताना, सोलापूर जिल्ह्यात मात्र अन्न भेसळ विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र समोर आले आहे. सोलापुर जिल्ह्यात अद्याप एकाही भेसळखोरावर ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ही धार्मिक स्थळे असून या ठिकाणी दररोज हजारो भाविक येत असतात त्या ठिकाणी प्रसाद म्हणून पेढा व अन्य वस्तू घेतल्या जातात. तर हॉटेल व्यवसाय ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो. अशा ठिकाणीच भेसळखोरांचे फावते आणि भेसळयुक्त पदार्थ विकले जातात अशा तक्रारी भाविकातून कायम होत असतात. त्यातच आता आषाढी यात्रेची चाहूल लागताच पंढरपूरात लाखो विठ्ठल भक्त दाखल होत असतात.

पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! एफडीएची राज्यभर धडक मोहीम; ३ दिवसांत ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील

पेढे, मिठाई, दूध, तूप, तेलकट खाद्यपदार्थ आणि हॉटेलमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी येत असतानाही अन्नभेसळ विभागाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याची चर्चा असून केवळ किरकोळ कारवाई दाखविली जाते. परंतू ठोस उपाययोजना करण्यात अन्न भेसळ विभागाचे अधिकारी अपयशी ठरले असल्याचे दिसून येते. त्यामुळे “राज्यात धाडी… आणि सोलापुरात शांतता” अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. काही अधिकारी पुण्यात ट्रेनिंगमध्ये व्यस्त, तर काही रजेवर असल्याने विभागाचा कारभार अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आल्याची भावना आहे. त्यामुळे भेसळखोरांना अभय कोणाचे? हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.

दरम्यान, पंढरपूरातील पेढा कारखाने, दूध डेअऱ्या, मिठाई दुकाने आणि हॉटेलांची तातडीने तपासणी करून नमुने घेण्याची मागणी आता विठ्ठल भक्तांकडून जोर धरू लागली आहे. भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. कायद्याचे पालन करणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांनी राज्यभर दाखवलेली आक्रमकता पाहता, आता सोलापुर जिल्ह्यातील सुस्त अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

धाडींचे आदेश वरून… अधिकारी मात्र ट्रेनिंग आणि रजेवर!

कारवाई संदर्भात वरिष्ठांचे आदेश आहेत. मात्र पुणे येथे ट्रेनिंग असल्याने मागील दोन दिवस ट्रेनिंगसाठी गेलो होतो. त्यानंतर रजेवर असून सोमवारी कामावर रूजू होणार आहे. त्यानंतर माहिती दिली जाईल. सुनील जिंतूरकर सहाय्यक आयुक्त, पंढरपूर-मोहोळ विभाग

IAS Tukaram Mundhe : 20 वर्षात तब्बल 24 वेळा बदली; आता तर थेट राजीनाम्याची मागणी, ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं

Web Title: Fda commissioner tukaram mundhe action statewide but solapur pandharpur officials on leave

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • food
  • pandharpur
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची मोठी भेट! दादर-पंढरपूर दरम्यान सुटणार २ विशेष गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक
1

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची मोठी भेट! दादर-पंढरपूर दरम्यान सुटणार २ विशेष गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

तेजोत्सवात न्हाले विठ्ठल मंदिर! संपू्र्ण परिसर झाला प्रकाशमय; पंढरीचे आध्यात्मिक वैभव खुलले
2

तेजोत्सवात न्हाले विठ्ठल मंदिर! संपू्र्ण परिसर झाला प्रकाशमय; पंढरीचे आध्यात्मिक वैभव खुलले

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
3

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन
4

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.