Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe: लोकांच्या आरोग्याशी खेळाल तर खबरदार! ‘या’ शहरात FDA ची धडक कारवाई

जप्त केलेल्या गुळाचे नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 19, 2026 | 08:10 PM
पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त, अवमानक अन्नसाठ्यांवर कारवाईचा बडगा

पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त, अवमानक अन्नसाठ्यांवर कारवाईचा बडगा

Follow Us
Follow Us:

अन्न व औषध प्रशासनाची सांगलीत कारवाई
कारवाईने मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये उडाली खळबळ
आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी

सांगली: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सांगलीत मोठी कारवाई केली आहे. वसंतदादा मार्केट यार्डातील मितेश सेल्स कॉर्पोरेशन या गूळ विक्री पेढीवर (Tukaram Mundhe) छापा टाकून तब्बल ४ लाख ३० हजार रुपये किमतीचा गुळाचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईने मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुळामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर तसेच आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम राबवली.

तुकाराम मुंढेंची पुन्हा मोठी कारवाई; आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेच केले रद्द

दोन तास कसून तपासणी

सहाय्यक आयुक्त रावसाहेब समुद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित पेढीची सुमारे दोन तास तपासणी केली. अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घुमरे यांच्यासह अन्य चार अधिकाऱ्यांचा पथकात सहभाग होता. तपासणीदरम्यान गुळाच्या साठ्यावर आवश्यक अधिकृत लेबलिंग नसल्याचे आढळून आले. तसेच गूळ पावडर आणि गुळाच्या ढेपांच्या गुणवत्तेबाबत पथकाला संशय निर्माण झाला. त्यानंतर संशयास्पद वाटणारा सुमारे ४.३० लाख रुपये किमतीचा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.

नमुने प्रयोगशाळेत

जप्त केलेल्या गुळाचे नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार

भेसळखोरांना इशारा

अन्न व औषध प्रशासनाचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निकृष्ट अथवा भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. गुळासारख्या रोजच्या वापरातील पदार्थात भेसळ होत असल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाच्या या कारवाईनंतर गूळ विक्रेत्यांच्या साठ्यांची तपासणी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची (FDA) धडक कारवाई सध्या चर्चेत आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या खाद्यपदार्थांविरोधात कारवाईला वेग आल्याचे चित्र आहे.

Web Title: Fda tukaram mundhe 4 30 lakhs worth of goods seized in sangli on the counterfeiting of jaggery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • FDA Action
  • FDA Raid
  • sangli news
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक
1

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?
2

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल
3

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!
4

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.