Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोदामांच्या निर्मितीमुळे भिवंडी जलमय होण्याची भीती! तालुका महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता; नागरिकांची अपेक्षा

पूर्वजांनी जीवाच्या मोलानी जपलेल्या शेत जमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर असून या शेत जमिनीचा विकास करण्याच्या नावावर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील म्हणजेच कशेळी, काल्हेर, कोपर, पूर्णा आणि इतर गावातून प्रचंड प्रमाणात टोलजंग गोदामे उभारली गेली आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 25, 2026 | 11:35 AM
गोदामांच्या निर्मितीमुळे भिवंडी जलमय होण्याची भीती! तालुका महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता; नागरिकांची अपेक्षा

गोदामांच्या निर्मितीमुळे भिवंडी जलमय होण्याची भीती! तालुका महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता; नागरिकांची अपेक्षा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई महानगरीच्या सीमेवर ठाणे जिल्हा वसला असून यापूर्वी ठाणे जिल्ह्याला भात पिकाचे कोठार म्हणून गौरवाने संबोधले जायचे. याच जिल्ह्यातील भिवंडी तालुका भात पिकाचे आगार म्हणून ठाणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध होता. परंतु, आता भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागाचे रूपडे देखील बदलले असून गोदामांचा तालुका अशी भिवंडीची ओळख बनली आहे. वाढती गोदामे भिवंडी जलमय करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात खाडीतून अथवा नदीतून डुबी मारून पडावा द्वारे येथे काढणे, वीटभट्टी द्वारे विटा तयार करणे, मासेमारी व मच्छीविक्री करणे, लाकडे गोळा करणे, भाजीपाल्याची लागवड व विक्री करणे, दगड माती उत्खनन करणे, तसेच भात शेती करणे हे व्यवसाय नियमितपणे केले जात होते.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai News: टीबीमुक्त मुंबईची उद्यापासून व्यापक मोहीम! राज्यपाल जिष्णू वर्मा यांची संकल्पना; धारावी, सायनमधून शुभारंभ

तालुक्यातील शेत जमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर

आजमितीस देखील काही प्रमाणात हे व्यवसाय भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातून केले जात आहेत. परंतु, काळाच्या ओघात व निसर्गाच्या असमतोलतऽमुळे व मानवी चुकांच्या कारणामुळे तसेच शासकीय अवकृपेमुळे या व्यवसायावर गंडांतर आले असून हे व्यवसाय विशेषतः भिवंडी तालुक्यातील भाजीपाला उत्पादन व भात शेती धोक्यात आली आहे.

पूर्वजांनी जीवाच्या मोलानी जपलेल्या शेत जमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर असून या शेत जमिनीचा विकास करण्याच्या नावावर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील म्हणजेच कशेळी, काल्हेर, कोपर, पूर्णा आणि इतर गावातून प्रचंड प्रमाणात टोलजंग गोदामे उभारली गेली आहेत. तर काही ठिकाणी गोदामे उभारण्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

या मोठ्या प्रमाणात गोदामांची निर्मिती माळरान किंवा पडीक जमिनीवर न करता संबंधित शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनीवर सर्रासपणे करण्यात आली आहे. या गोदामांची निर्मिती करताना शेतजमिनीमध्ये प्रचंड प्रमाणात माती दगडांचा भराव करण्यात आल्यामुळे या शेतजमिनीवर व शेतजमिनीच्या परिसरात असणारे नैसर्गिक नाले, ओहळ, ओढे, खाच, खळगे आणि छोटे मोठे नैसर्गिक तलाव बुजवण्यात आले आहेत.त्यामुळे नैसर्गिकरित्या पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यास व त्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत असून आगामी मान्सूनचा कालावधी लक्षात घेता अतिवृष्टी झाल्यास गोदाम पहुंचातील पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने न होता पूरस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई! सलग चौथा शनिवार कोरडा; नागरिक त्रस्त, नेत्यांवर निष्क्रियतेचे आरोप

पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था संबंधित गोदाम मालक किंवा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांनी केल्याचे दिसून येत नाही. अशी उपाययोजना करणेचे कोणतेही नियोजन ठाणे जिल्हा महसूल प्रशासनने किंवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी केल्याचे देखील दिसून येत नाही. या सर्व गोदामांची अति विराट बांधकामे करताना प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली असून शेतजमिनीच्या बांधावर व माळरानावर दिमाखात उभी असलेली निसर्गसंपन्न वृक्षसंपदा नष्ट झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Fear of flooding bhiwandi due to construction of godowns taluka revenue administration needs to be vigilant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Monsoon Alert
  • monsoon care
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: टीबीमुक्त मुंबईची उद्यापासून व्यापक मोहीम! राज्यपाल जिष्णू वर्मा यांची संकल्पना; धारावी, सायनमधून शुभारंभ
1

Mumbai News: टीबीमुक्त मुंबईची उद्यापासून व्यापक मोहीम! राज्यपाल जिष्णू वर्मा यांची संकल्पना; धारावी, सायनमधून शुभारंभ

Mumbai News: हार्बर एसी लोकलला ‘सुपरफास्ट’ प्रतिसाद! १५ दिवसांत ६५ टक्क्यांची प्रवासीवाढ; महसूलही दुपटीकडे
2

Mumbai News: हार्बर एसी लोकलला ‘सुपरफास्ट’ प्रतिसाद! १५ दिवसांत ६५ टक्क्यांची प्रवासीवाढ; महसूलही दुपटीकडे

मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई! सलग चौथा शनिवार कोरडा; नागरिक त्रस्त, नेत्यांवर निष्क्रियतेचे आरोप
3

मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई! सलग चौथा शनिवार कोरडा; नागरिक त्रस्त, नेत्यांवर निष्क्रियतेचे आरोप

Mumbai News: राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार! देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले
4

Mumbai News: राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार! देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.