Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खते, बियाणे बांधावर मिळविण्यासाठी नोंदणी करावी; कृषीमंत्री दादा भुसे यांचे आवाहन

शेतकऱ्यांना बचत गट व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत एकाचवेळी खते, बियाणे व कीटकनाशके बांधावर उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचत गट व विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2022 | 11:16 PM
खते, बियाणे बांधावर मिळविण्यासाठी नोंदणी करावी; कृषीमंत्री दादा भुसे यांचे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : शेतकऱ्यांना बचत गट व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत एकाचवेळी खते, बियाणे व कीटकनाशके बांधावर उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचत गट व विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

कृषी विभाग आणि ‘आरसीएफ’ कंपनीच्या वतीने राज्यात शेतकरी बांधवांना एकत्रपणे बांधावर खतेवाटपाचा प्रारंभ भुसे यांच्या हस्ते मालेगाव येथे पार पडला. त्या वेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, भास्कर जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी संदीप पवार, मंडळ कृषी अधिकारी भाऊसाहेब आढाव, संदीप गलांडे, राहुल जाधव, दीपक मालपुरे, भगवान मालपुरे, आरसीएफ कंपनीचे विपणन अधिकारी बजरंग कापसे, विशाल सोनवलकर, शेतीनिष्ठ शेतकरी विनोद जाधव, मनोहर बच्छाव यांच्यासह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

दादा भुसे नेमकं काय म्हणाले? 

सध्या शेतीविषयक परिस्थिती कठीण असली तरी शेतकरी अतिशय परिश्रमपूर्वक काम करत आहे. शेतकऱ्यांनी जर एकत्रितपणे खते, बियाणे व कीटकनाशके यांची खरेदी केली तर त्यांना शेताच्या बांधावर ते एकाचवेळी उपलब्ध झाल्याने त्याचा फायदा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी बचत गट व विविध कार्यकारी सहकारी संस्थाकडे मागणी नोंदविणे आवश्यक आहे. असे केल्यास कृषी विभागांतर्गत खतांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून पुरेशा प्रमाणावर साठा उपलब्ध करून देता येणार आहे. या अनुषंगानेच कृषी विभागाने खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचनाही भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

[read_also content=”मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले : वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/health-minister-rajesh-topes-big-statement-about-monkey-pox-disease-what-exactly-did-he-say-read-more-nrdm-284916.html”]

दरम्यान खते वापरताना शेताच्या मातीचा नमुना तपासून जमीन आरोग्य पत्रिका तयार करावी. ही पत्रिका तयार केल्यानंतर आवश्यकतेनुसार खतांचा वापर करावा. त्याचप्रमाणे जैविक खतांचा वापर केल्यास त्याचा फायदा होऊन कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. तसेच इतर सेंद्रिय खते, जैविक खतांचा वापर केल्याने रासायनिक खतांच्या तुलनेत दहा टक्के बचतही होणार आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सर्व खतांचे महत्त्व पटवून द्यावे, असेही भुसे यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Fertilizers seeds should be registered to get on the dam appeal of agriculture minister dada bhuse nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2022 | 11:16 PM

Topics:  

  • Agriculture Minister Dada Bhuse
  • cmomaharashtra
  • Nashik News
  • NAVARASHTRA
  • shivsena

संबंधित बातम्या

Sanjay Raut News : शिंदे सेनेचा कोथळा हा अमित शाहांचं काढणार अन् 35 आमदार फोडणार..; संजय राऊतांचा दावा
1

Sanjay Raut News : शिंदे सेनेचा कोथळा हा अमित शाहांचं काढणार अन् 35 आमदार फोडणार..; संजय राऊतांचा दावा

Nashik : तपोवन झाडतोडीचा मुद्दा तापला, सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका
2

Nashik : तपोवन झाडतोडीचा मुद्दा तापला, सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका

PALGHAR : डहाणूत BJP विरुद्ध शिवसेना आमनेसामने ! जिंकणार कोण?
3

PALGHAR : डहाणूत BJP विरुद्ध शिवसेना आमनेसामने ! जिंकणार कोण?

Raj Thackeray News: साधुंच्या नावाखाली लाडक्या उद्योगपतींच्या घशात जमीन;तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
4

Raj Thackeray News: साधुंच्या नावाखाली लाडक्या उद्योगपतींच्या घशात जमीन;तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.