Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलीम फ्रुट प्रकरण: भारतात ‘दहशतवादी कृत्यांसाठी’ डी-कंपनीकडून वित्तपुरवठा

दाऊदने पाकिस्तानच्या आयएसआयच्या मदतीने भारतीय लोकांमध्ये भीती निर्माण करून मुंबईसह इतर भागात दहशतवादी हल्ले करण्याशी संबंधित कारवाया करण्यासाठी तसेच राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांसह अन्य व्यक्तींवर हल्ले करून भारतातील लोकांमध्ये दहशत माजवण्यासाठी डी कंपनीने एक विशेष युनिट स्थापन केल्याची माहिती मिळाली असल्याचे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 08, 2022 | 07:31 PM
सलीम फ्रुट प्रकरण: भारतात ‘दहशतवादी कृत्यांसाठी’ डी-कंपनीकडून वित्तपुरवठा
Follow Us
Follow Us:
  • राजकारण्यांना लक्ष्य करण्यासाठी विशेष सेल, एनआयएचा आरोपपत्रातून दावा
मुंबई – फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भारतात ‘डी-कंपनी’च्या दहशतवादी कारवायांना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना हवालामार्फत “मोठी रक्कम” पाठवल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्रातून केला आहे. तसेच प्रतिष्ठीत आणि राजकीय व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठीही विशेष सेल स्थापन केल्याचा दावाही आरोपपत्रात केला आहे.

दहशतवादी कारवायासाठी वित्तपुरवठा केल्याप्रकरणी एनआयएने नुकतीच आरीफ भाईजान, शब्बीर शेख आणि मोहमम्द सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट यांना अटक केली होती. तिघेही दाऊदचा साथीदार आणि कुख्यात गुंड छोटा शलीकचे नातेवाईक आहेत. त्यांच्या अटकेनंतरच एनआयएने केलेल्या चौकशी आणि तपासाच्या आधरावर शनिवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तिघा आरोपींसह दाऊद आणि छोटा शकील यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

दाऊदने पाकिस्तानच्या आयएसआयच्या मदतीने भारतीय लोकांमध्ये भीती निर्माण करून मुंबईसह इतर भागात दहशतवादी हल्ले करण्याशी संबंधित कारवाया करण्यासाठी तसेच राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांसह अन्य व्यक्तींवर हल्ले करून भारतातील लोकांमध्ये दहशत माजवण्यासाठी डी कंपनीने एक विशेष युनिट स्थापन केल्याची माहिती मिळाली असल्याचे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींनी परदेशात राहणाऱ्या फरार आरोपींकडून हवालामार्फत मोठी रक्कम मिळवल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

२०११ मध्ये आणि त्यानंतरही आरोपी सलीम कुरेशीने शकील आणि दाऊदच्या सांगण्यावरून मुंबईतील सुमारे २.७० कोटी किंमतीचे दोन फ्लॅट पीडितांना धमकावून हडप केल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. तसेच सलीम फ्रूटने दुसऱ्या एका प्रकरणात लोकांना धमकावून ५३.७५ लाख रुपये उकळल्याचेही समोर आले असून अन्य काही प्रकरणातही आरोपी दाऊद आणि शकीलच्या नावाने धमक्या देऊन पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Financing by d company for terrorist acts in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2022 | 05:08 PM

Topics:  

  • D-Company
  • Marathi News

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा
1

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष
2

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका
3

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?
4

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.