Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिरंगुट घाटात वऱ्हाडाच्या बसला आग; बसमधील महिलेने प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला

पिरंगुट घाटामध्ये चाले (ता. मुळशी) येथून स्वारगेट (पुणे) येथे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या खासगी बसने अचानक पेट घेतला. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 06, 2024 | 04:33 PM
पिरंगुट घाटात वऱ्हाडाच्या बसला आग; बसमधील महिलेने प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला
Follow Us
Close
Follow Us:
पुणे : पिरंगुट घाटामध्ये चाले (ता. मुळशी) येथून स्वारगेट (पुणे) येथे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या खासगी बसने अचानक पेट घेतला. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. बसमधील एका महिलेला धूर येत असल्याचे लक्षात आल्याने तिने प्रसंगावधान राखत चालकास माहिती दिली. त्यामुळे वेळीच सर्व वर्‍हाडी बसमधून खाली उतरले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली.
चाले येथील लग्नकार्य उरकून वर्‍हाडी मंडळींना घेऊन खासगी बस स्वारगेट (पुणे) च्या दिशेने जात होती. बसमध्ये जवळपास २० जण होते. त्यामध्ये लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. रात्री १० वाजता बस पिरंगुट घाटातून वर आली असता शेवटच्या टप्प्यावर म्हसोबा मंदिरासमोर बसच्या इंजिनमधून अचानक दूर येऊ लागला.
यावेळी बसमधील वैशाली भानुदास सुतार (रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) यांना धूर दिसून आला. त्यांनी प्रसंगावधान राखत ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे चालकाने देखील तातडीने सर्व वर्‍हाडींना बसमधून खाली उतरवले आणि काही मिनिटांतच बसला आगीने घेरले.
घाटात वाहतूक कोंडी
बस जळून खाक झाल्यानंतर अग्निशामक दलाचा बंब आला. जवानांनी आग आटोक्यात आणली. ‘वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता,’ अशी भावना या अपघातातून बचावलेल्या वर्‍हाडी मंडळींनी व्यक्त केली. या वेळी घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. काही स्थानिक युवकांनी वाहतूक नियंत्रित केली. दरम्यान जळालेली ही बस स्कूल बस असल्याची माहिती बसमधील काही जणांनी तसेच प्रत्यक्षदर्शी यांनी दिली.

Web Title: Fire at bus la pirangut ghat disaster was averted as the woman in the bus kept a watchful eye nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2024 | 04:33 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • school bus

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.