कल्याण : आजकाल शॉर्टसर्किटमुळे आग (Fire) लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. कल्याणमध्येही अशीच एक घटना घडली आहे. कल्याण (Kalyan Fire) पूर्वेतील जनकल्याण रुग्णालयामध्ये (Jankalyan Hospital) शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. मात्र वेळीच अग्नीशमन दल आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची व हॉस्पिटलच्या स्टाफची खूप पळापळ झाली.
[read_also content=”ईडीने 30 तास केली कसून चौकशी, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्याला आला हृदयविकाराचा तीव्र झटका, रुग्णालयात उपचार सुरु https://www.navarashtra.com/maharashtra/heart-attack-to-one-employee-of-kolhapur-district-bank-after-30-hours-ed-inquiry-nrsr-367126.html”]
कल्याण पूर्व चक्की नाका परिसरामध्ये जनकल्याण हॉस्पिटलमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये धूरच धूर पसरला. शॉर्टसर्किटमुळे हॉस्पिटलला आग लागली म्हणून रुग्णांच्या नातेवाईक व हॉस्पिटलचा स्टाफची धावपळ सुरू झाली. परिसरातील नागरिक देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले.
या रुग्णालयामध्ये 20 ते 25 रुग्ण उपचार घेत आहेत परंतु या शॉर्टसर्किटमुळे हॉस्पिटलमधील रुग्णांना कोणतीही दुखापत झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या स्टाफने अग्निशामक दलाला कळवताच अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणली. याविषयी अग्नीशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही किरकोळ स्वरुपाची आग होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.
दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. हॉस्पिटल व्यवस्थापनाने नादुरुस्त युनिटची दुरुस्ती करुन घेतली आहे.