Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News : शिवसेना ठाकरे पक्षाच्या पाच नगरसेवकांचा ‘जय महाराष्ट्र’, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Shiv Sena Uddhav Bal Thackeray News : दापोली नगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या पाच नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 17, 2025 | 06:18 PM
शिवसेना ठाकरे पक्षाच्या पाच नगरसेवकांचा 'जय महाराष्ट्र', शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)

शिवसेना ठाकरे पक्षाच्या पाच नगरसेवकांचा 'जय महाराष्ट्र', शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Shiv Sena Uddhav Thackeray News Marathi : महायुतीचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर सुरु झाल्याचे सांगत लवकरच शिवसेना शिंदे गटात माजी आमदार व खासदारांचे प्रवेश होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, ठाकरेंना धक्का देत शिवसेना शिंदे गटात अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत. कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचा एक निष्ठावंत चेहरा असलेले राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला. तर आमदार भास्कर जाधव हे त्याच पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोकणातून ठाकरेंची शिवसेना धोक्यात असल्याचे पाहायला मिळत आहे.

अशातच आता दापोली नगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या पाच नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहत आपण वेगळा गट स्थापन करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेनेतील आऊटगोईंग काही केल्या कमी होताना दिसून येत नाही.

ठाकरे गटाच्या ‘त्या’ मुद्याला शिंदे गटाच्या नेत्याचा पाठिंबा! KDMC नगरररचनाकार घोटाळ्याला जबाबदार असल्याची सोशल मिडियावर पोस्ट

एकीकडे कोकणात

ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडत असल्याचे पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे मुंबईतील उपविभाग प्रमुखान सांगितले की, साहेब मला माफ करा म्हणत आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिवसेना पक्षाच्या राजकीय वर्तुळात अनेक गोंधळ सुरू आहेत आता दापोलीतून 5 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दापोली नगरपंचायतीत शिवसेना उबाठाला खिंडार पडले असून आता पाच नगरसेवकांनी जिल्हा अधिकाऱ्यांना स्वतःचा गट स्थापन करण्यासाठी पत्र पाठवले आहे, आवश्यक त्या कागदपत्रांची देखील पूर्तता केली आहे. हे पाचही नगरसेवक करणार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेना उबाठात या 5 नगरसेवकांनी प्रवेश केला होता. मात्र, आता विकासकामांसाठी आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.विलास शिगवण, अन्वर राखांगे, मेहबूब तलघरकर, संतोष कालकुटके आणि अश्विनी लांजेकर यांनी तुमचा पुढचा गट तयार केला आहे.

वैभव नाईक मातोश्रीवर

दरम्यान, कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहात सुरू असतानाच, माजी आमदार वैभव नाईक हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. वैभव नाईक यांच्या मागणीवरून काही दिवसांपूर्वी एसीबीची चौकशी सुरू झाली आहे. पण कोकणातील अनेक अधिकारी ठाकरे गटाची साथ सोडत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या यांच्याशी चर्चा करण्यासाठी वैभव नाईक दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांचे सभेतील भाषण

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची २० तारखेला आणि आमदारांची २५ तारखेला प्रत्यक्ष मातोश्रीवर बैठक होणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे खासदार आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. दिल्लीत आर्थिक अधिवेशन सुरू होताच, आदित्य ठाकरे आणि त्यांचे खासदार दिल्लीत बैठक घेतली. सध्या ऑपरेशन टायगरवर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि तिथे राजकीय चर्चा देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे २० फेब्रुवारी रोजी खासदारांची आणि २५ फेब्रुवारी रोजी आमदारांची बैठक घेणार आहेत.

सोसायटीतून बॅटरी चोरणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या; 8 बॅटरी अन् रिक्षा जप्त

Web Title: Five corporators of shiv sena uddhav bal thackeray sena party in dapoli municipality have decided to leave thackerays side

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • Dapoli
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी
1

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
2

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

Shivsena News : शिवसेनेकडून लोकसभा संपर्कप्रमुखांची घोषणा; मुंबई-ठाण्याची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदेंकडे
3

Shivsena News : शिवसेनेकडून लोकसभा संपर्कप्रमुखांची घोषणा; मुंबई-ठाण्याची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदेंकडे

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल
4

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.