Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! मुंबईत पहिल्यांदाच फक्त भारतीय पारंपारिक खेळांसाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध असणार

महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईत पहिल्यांदाच केवळ भारतीय पारंपारिक खेळांसाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2025 | 09:32 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

सुरेश जोशी, माजी सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विशेष उपस्थितीत आणि महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या उपक्रमांतर्गत, मुंबईत पहिल्यांदाच केवळ भारतीय पारंपारिक खेळांसाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारण्यात आला आहे व पुढेही सुरु राहील. कुर्ला ITI येथील मोकळ्या मैदानाचे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रीडांगण’ असे नामकरण करून त्याचे भूमिपूजन पार पडले. याचसोबत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी, जि मुंबई उपनगर या संस्थेचे नामकरण ‘जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी’ असे करण्यात आले आहे.

प्रसंगी बोलताना सुरेश जोशी म्हणाले “स्वामी विवेकानंद, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणा प्रताप आणि जामसाहेब या ४ विभूतींच्या नावाचे वलय या प्रांगणाला लाभले असल्याने येथील ऊर्जा भारावून टाकणारी आहे. नव्या पिढीला नक्कीच येथे अखंड प्रेरणा मिळेल. आपला वारसा जपण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.”

अहो आश्चर्यम्! विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाले सत्ताधारी अमोल मिटकरी; नेमकं कारण काय?

“समाजासाठी निस्वार्थी वृत्तीने काम करणारे जामसाहेब मुकादम आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. वकिलाच्या पेशात सर्वोच्च स्थानी असताना सुद्धा वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी आपली सनद सोडली आणि समाजकार्याचा वसा हाती घेतला. निवृत्त होणं, भौतिक सुखांचा भोग घेणं त्यांना सहज शक्य होतं पण त्या सर्वांचा त्याग करून, त्यांनी समाजासाठी योगदान दिले. आज भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीमध्ये गोवंडी आयटीआयला जामसाहेब मुकादम यांचे नाव देण्यात येत आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.” असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

या मैदानावर कबड्डी, खो-खो, लंगडी, मलखांब, कुस्ती, लगोरी, लेझीम, विटी-दांडू, पंजा लढवणे, दंड बैठक, दोरीच्या उड्या, पावनखिंड दौड, रस्सीखेच, फुगडी, सुरपाट्या, उंचउडी, पकडा-पकडी, सूरपारंब्या, भोवरा फिरवणे, आंधळी कोशिंबीर, लंपडाव यांसारख्या पारंपारिक भारतीय खेळांना प्राधान्य दिले जाणार आहे. स्थानिक खेळाडूंना तसेच युवा पिढीला या खेळांसाठी दर्जेदार सुविधा आणि नियमित सरावाची संधी मिळणार आहे. हा उपक्रम भारतीय पारंपारिक खेळांना चालना देण्यासाठी आणि नव्या पिढीला या खेळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Jaykumar Gore Controversy: महिलेला विवस्त्र फोटो पाठवले की नाही? जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं

भारतीय क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी आणि युवा पिढीला देशी पारंपारिक खेळांकडे वळवण्यासाठी मंगल प्रभात लोढा यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली. याआधीही त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये मुंबई उपनगरात ‘क्रीडा महाकुंभ’ स्पर्धेचे आयोजन करून भारतीय खेळ आणि खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. २ मार्च २०२५ पासून नाशिक येथे राज्यातील औद्योगिक शासकीय संस्थांसाठी पारंपारिक देशी खेळांचे ‘क्रीडा महाकुंभ’ आयोजित करण्यात आले आहे.

Web Title: For the first time in mumbai a separate ground will be available only for indian sports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 09:32 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Marathi News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न
1

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

Nanded : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रोजगार मेळावा, सहा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती
2

Nanded : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रोजगार मेळावा, सहा हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

नरीमन पाईंटलाच पक्षाला नवीन कार्यालय बांधून द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा
3

नरीमन पाईंटलाच पक्षाला नवीन कार्यालय बांधून द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

Mumbai News : “वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची सर्व पक्षांची मागणी”
4

Mumbai News : “वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची सर्व पक्षांची मागणी”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.