Photo Credit- Social Media संजय राऊत, विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना जयकुमार गोरेंचे प्रत्युत्तर
मुंबई: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंगळवारी (4 मार्च) धनंजय मुंडेनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला चोवीस तास उलटत नाहीत तोच महायुतीचे आणखी एक मंत्री जयकुमार गोरेंवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या आरोपांना दुजोरा दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.
स्वारगेटप्रमाणे जे प्रकरण समोर येत आहे. तसाच एक प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय. शिवकाळातील सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला आहे, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती अबला महिला पुढल्या काही दिवसांत विधानभवनासमोर उपोषणाला बसतेय. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसले पाहिजेत. हे सर्व रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत त्यांची अमित शाहांकडे तक्रार करणार आहे,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Jaykumar Gore : महायुतीचा आणखी एक नेता आला गोत्यात! पैलवान मंत्र्याने महिलेला पाठवला विवस्त्र फोटो
खासदार राऊतांच्या आरोपांनंतर जयकुमार गोरे यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 2017 साली माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. 2017 साली विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या काळात माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. 2019 न्यायालयाचा निकाल आला. माझी निर्दोष मुक्तता करण्यात आली.मी असे कोणतेही फोटो पाठवले नाही. तसेच, जप्त मुद्देमाल आणि इतर गोष्टीही नष्ट कऱण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या घटनेला सहा वर्षे झाली. सहा वर्षांनंतर हा मुद्दा पुन्हा समोर आला . किमान आपण कुठल्या वेळी हा विषय बोलावा आणि कुठल्या वेळी काय समोर आणावं हे विरोधकांनीही याची विरोधकांनीही मर्यादा ठेवली पाहिजे. विरोधकांनी खालच्या पातळीचं राजकारण करू नये. राजकारणात अनेक गोष्टी असतात. पण मी जबाबदारपणे काम करतो. मी एवढचं सांगतो की या घटनेवर कोर्टाने निकाल दिला आहे. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे. त्या सर्वांवर मी हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहात मांडणार आहे.
Abu Azmi Suspension : अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन, औरंगजेब उदात्तीकरण प्रकरण भोवलं
तसेच, माझ्यावर आरोप करणाऱ्यावर मी अब्रुनुकसानीचाही खटला दाखल करणार आहे. या प्रकरणावर जी कारवाई करणे गरजेचे आहे ती सर्व कारवाई मी करणार आहे. जयकुमार गोरेंनी महिलेला त्रास दिला की नाही दिला, यासंदर्भात पोलिसांनीच चौकशी करावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी. जे कोणी माझ्याविरोधात कट रचत आहेत, त्यांच्यावरही कारवाई करावी.