Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू काय पालिकेचा मालक आहेस का?’; माजी आरोग्य निरीक्षकांची साताऱ्यात बाचाबाची

सातारा पालिका आणि तेथील मलईदार टेंडर याची संपूर्ण जिल्ह्यात नेहमी चविष्ट चर्चा असते. बांधकाम विभाग बिलो टेंडर आणि ॲबॉव्ह टेंडरचा पद्धतशीर खेळ करून मर्जीतल्या ठेकेदाराला ते काम मिळून देण्यामध्ये पटाईत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 30, 2025 | 11:47 AM
'तू काय पालिकेचा मालक आहेस का?'; माजी आरोग्य निरीक्षकांची साताऱ्यात बाचाबाची

'तू काय पालिकेचा मालक आहेस का?'; माजी आरोग्य निरीक्षकांची साताऱ्यात बाचाबाची

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा नगरपालिकेच्या दोन माजी आरोग्य निरीक्षकांची सातारा शहरातील एका उड्डाणपुलाखाली आर्थिक कारणावरून जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ प्रसार माध्यमांच्या हाती लागल्याने पालिकेतले चिरीमिरीचे राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे.

सातारा पालिका आणि तेथील मलईदार टेंडर याची संपूर्ण जिल्ह्यात नेहमी चविष्ट चर्चा असते. बांधकाम विभाग बिलो टेंडर आणि ॲबॉव्ह टेंडरचा पद्धतशीर खेळ करून मर्जीतल्या ठेकेदाराला ते काम मिळून देण्यामध्ये पटाईत आहे. सातारा नगरपालिकेचे दोन माजी आरोग्य अधिकारी अशाच काहीशा आर्थिक कारणावरून बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाखाली तंटत असल्याचे दिसून आले. या भांडणाला नगरपालिकेचे विद्यमान आरोग्य अधिकारी साक्षीदार होते. विषय होता काही जुन्या देण्याघेण्याचा जो साताऱ्यातून मिळणार होता.

हेदेखील वाचा : चिनी नागरिकाच्या संपर्कात राहून आखला फसवणुकीचा प्लान; पुण्यातील चित्रपट निर्मात्याला पोलिसांनी ठोेकल्या बेड्या

दरम्यान, दोन्ही आरोग्य निरीक्षक सातारा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये बदलून गेले आहेत. दोन्ही आरोग्य निरीक्षक साताऱ्यात राहण्यासाठी असून अजूनही त्यांचे लागेबांधे सातारा नगरपालिकेशी आहेत.

तू काय पालिकेचा मालक आहेस का?

नव्या जोशाचा आरोग्य निरीक्षक एकेकाळी व्यवस्थापनाच्या गळ्यातील ताईत होता, तर दुसऱ्या आरोग्य निरीक्षकाच्या कामाचा प्रकाश फारसा न पडल्याने तो आरोग्य निरीक्षक प्रशासक अभिजीत बापट यांच्या गुड बुकमध्ये कधीच नव्हता. अशा दोन आरोग्य निरीक्षकांची हमरातुमरी काही जणांनी गोपनीयरीत्या चित्रित केली. ही हमरातुमरी आर्थिक देवाणघेवाणीच्या संदर्भातील होती. आता ही कोणत्या हिशोबाची देवाण-घेवाण होती हे मात्र समजले नाही. मात्र, तू इतका शहाणा झालास का?, तू काय पालिकेचा मालक आहेस का? अशा भाषेमध्ये दोन्ही आरोग्य निरीक्षकांनी एकमेकांचे वाभाडे काढले.

आरोग्य विभागाची पुन्हा एकदा चर्चा

एकूणच या प्रकारामुळे सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सातारा पालिकेत १३ टक्क्याचे राजकारण चालते, असे म्हटले जात होते. कोणत्याही ठेकेदाराला विचारले असता टेंडर मिळताना बरीच भागवाभागवी करावी लागते, असे ठेकेदार वैतागून सांगतात. त्यामध्ये आरोग्य विभाग ही येतो.

हेदेखील वाचा : Shrikant Shinde in Parliament : लोकसभेमध्ये 50 खोकेंच्या घोषणा; श्रीकांत शिंदे म्हणाले, “ही महापालिका नाही तर संसद…

Web Title: Former health inspectors clash in satara know reason behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara Municipality
  • Satara News

संबंधित बातम्या

नगरपरिषद शिक्षकांना एनपीएसचा दिलासा, अर्जुन कोळी यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यशस्वी प्रतिसाद
1

नगरपरिषद शिक्षकांना एनपीएसचा दिलासा, अर्जुन कोळी यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यशस्वी प्रतिसाद

Karad News: अरे बापरे! वृक्षारोपण करायला गेले अन्‌ मधमाशांच्या तावडीत सापडले; ४० शाळकरी मुले रुग्णालयात!
2

Karad News: अरे बापरे! वृक्षारोपण करायला गेले अन्‌ मधमाशांच्या तावडीत सापडले; ४० शाळकरी मुले रुग्णालयात!

वाई-पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प
3

वाई-पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प

Satara News : ऐन पावळ्यात मसूर येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांना धरलं जातंय वेठीस
4

Satara News : ऐन पावळ्यात मसूर येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांना धरलं जातंय वेठीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.