ठाणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळावाच्या (ShivSena Dasara Melava 2022) निमित्ताने केलेल्या भाषणाच्या विरोधात (Against The Speech) ठाण्यातील (Thane) शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत (The women officials of the Shinde group have become aggressive). उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना मनोरुग्णालयात भरती करण्याची मागणी या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
ज्या व्यक्तीने मुख्यमंत्री पद भोगलेलं आहे. त्या माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य कसं असलं पाहिजे. त्यांना या संपूर्ण गोष्टीची कल्पना असतानाही त्यांनी लहान बाळावर वक्तव्य करणं चुकीचे आहे. उध्दव ठाकरे यांची मानसिक पातळी ढासळली आहे.
[read_also content=”UPSC ने लाँच केले ‘Android App’, आता परीक्षा आणि भरतीशी संबंधित सर्व माहिती मिळणार एका क्लिकवर; पण… https://www.navarashtra.com/technology/upsc-launch-own-android-app-examination-and-recruitment-updates-on-one-click-but-one-of-the-facility-not-available-in-this-app-nrvb-333527.html”]
उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी यांना मनोरुग्णालयात भरती करण्यासाठी निवेदन दिले आहे. या मनोरुग्णांसाठी त्यांनी रुग्णालयात दोन बेडही रिझर्व्ह केले आहेत. याबाबतचे निवेदनही त्यांनी मनोरुग्ण अधिकाऱ्यांना दिले आहे.
नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाबाबत विधान केले होते. पदाच्या लालसेपोटी ठाकरे यांनी हे विधान केलं होतं. सध्या या विधानाबाबत राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका करताना लालसा किती याबाबत बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री असताना महत्त्वाची खाती, जबाबदाऱ्या दिल्या. मुलाला खासदारकी दिली आता यांना नातवालाही नगरसेवक बनवायची स्वप्न पडू लागली आहेत. अरे त्याला आधी मोठं होऊ दे, शिकू दे. या नंतरच्या गोष्टी आहेत तेव्हाचं तेव्हा पाहू पण नाही.
[read_also content=”आरारारा लैच खतरनाक! म्हशीने वंदे भारत ट्रेनला टक्कर दिल्याने झालीये भयंकर अवस्था कारण… https://www.navarashtra.com/viral/viral-photo-vande-bharat-express-very-bad-condition-hit-by-a-buffalo-innograted-6-days-ago-pm-of-india-narendra-modi-nrvb-333339.html”]
नेमका हाच धागा पकडून आता याच्यावरच राजकारण होऊ लागलं आहे. एवढ्या लहान बाळाबाबत असं कोणी बोलतं का? अशा कंड्या पिववल्या जात असून यालाच महत्त्व देण्याचा प्रयत्न राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
या सगळ्या प्रकाराबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या मुलाबाबत केलेल्या या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यात अनेक प्रश्न विचारले असून या तान्ह्या जिवाविषयी असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असंही या पत्रात नमूद केलं आहे.






