Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यातील घंटागाड्या गायब, मनसे आमदारांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

बऱ्याच ठिकाणी तर आठवडाभर कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत त्यामुळे घरामध्ये त्याचबरोबर रस्त्याच्या शेजारी कचरा तसाच साठून राहतो. स्वच्छता सेवेच्या मोहिमेचा शुभारंभ ठाण्यात झाला. मात्र चार दिवसापासून दिवा विभागातील कचरा उचलला गेला नव्हता. तर शिळफाटा भागातील घंटा गाड्या गायब आहेत यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 28, 2024 | 03:44 PM
ठाण्यातील घंटागाड्या गायब, मनसे आमदारांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
Follow Us
Follow Us:

ठाणे : ठाणे जिल्ह्यामध्ये अस्वच्छतेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. बऱ्याच ठिकाणी तर आठवडाभर कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत त्यामुळे घरामध्ये त्याचबरोबर रस्त्याच्या शेजारी कचरा तसाच साठून राहतो. पावसाचे दिवस असल्यामुळे कचऱ्याला घाण वास सुटतो आणि काही कचरा तर पाण्यामुळे वाहून जात असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई सुद्धा पसरते. आता खरचं आपलं ठाणे बदललं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्वच्छता सेवेच्या मोहिमेचा शुभारंभ ठाण्यात झाला. मोठ्या प्रमाणात या मोहिमेला नागरिक उपस्थित होते. मात्र चार दिवसापासून दिवा विभागातील कचरा उचलला गेला नव्हता. तर शिळफाटा भागातील घंटा गाड्या गायब आहेत. यातच डायघर येथील कचरा प्रकल्प चालविणाऱ्या ठेकेदाराला पैसे दिले नाही म्हणून काम बंद केले असे त्याने सांगितले आहे.

आता पोलिस बंदोबस्तात महापालिकेचे अधिकारी जाऊन त्याठिकाणी कचरा खाली केला. कामगारांना मारहाण केली, आत्ता तुम्हीच सांगा या अधिकाऱ्यांचे आम्ही करायचे काय? असा संतप्त सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

कल्याण ग्रामीण भागात कचरा समस्या सुटत नाही. मनसे आमदार राजू पाटील यांनी यासाठी वारंवार पाठपुरावा केला. जिल्हा अधिकाऱ्यांसोबत, महापालिका आयुक्त यांच्यासोबत बैठका घेतला. वारंवार मनसे आमदार कचरा प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासने दिली गेली. आता जो प्रकारसमोर आला आहे ते ऐकून एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिवा, शीळ, डायघर भागात कचऱ्याच्या समस्येमुळे नागरीक त्रस्त आहेत. नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करीत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या कार्यशैलीवर जोरदार टिका केली आहे. या अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्यासोबत काय करायचे याविषयी ट्वीट केले आहे. गेल्या चार दिवसाापासून दिवा विभागातील कचरा उचलला गेला नाही.

मा.मुख्यमंत्री साहेब, @mieknathshinde
खरंच आपले ठाणे बदलतंय का ? दिवा-शीळ विभाग ठाण्यातच येतो ना ?
हे प्रश्न विचाराचे कारण असे आहे की आपण १८ सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा २०२४ या मोहिमेचा शुभारंभ ठाण्यात पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट येथे केला व यावेळी सर्वं उपस्थित ठाणेकरांसह… pic.twitter.com/mWQ8AUEfAC
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 28, 2024

शीळ भागात सर्व कचरा गाड्या गायब आहेत. नागरिकांची बोंबाबोब सुरु आहे. त्यात नवा प्रकार समोर आला आहे. डायघर येथील कचरा प्रकल्प चालविणाऱ्या ठेकेदाराला पैसे दिले नाहीत. म्हणून त्याने काम बंद केले आहे, यानंतर महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी तिथे जाऊन जबरदस्तीने पोलिस बंदोबस्तात कचऱ्याच्या गाड्या खाली करुन कचऱ्याचा ढिग लावला आहे. इतकेच नाही तिथल्या सफाई कामगारांना मारहाण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न पेटू शकताे. मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी यांच्या उपस्थित स्वच्छता ही सेवा २०२४ या मेहिमेला सुरुवात झाली. रेतीबंदर, विसर्जन घाट या ठिकाणी सर्वांच्या उपस्थित स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत रोपांचे वाटपही केले. या प्रकरणीच मनसे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित करणारे ट्वीट केले आहे. खरोखच आपण घेतलेल्या शपथेचे पालिका अधिकारी पालन करीत आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे.

Web Title: Garbage carts missing in thane mns mla raju patil directly asked chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 03:44 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • MLA Raju Patil
  • thane

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.