मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या (BMC Electioin) पाशर्वभूमीवर आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मेळावा पार पडला. मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा मुंबईतील मुंबईतील नेस्को मैदानावर पार पडला. या मेळावाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जवळपास पाऊणतास राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या भाषणात विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी राज्यपाल, महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे, महापुरुषांची बदनामा करणाऱ्यांवर तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा होतील, पण कामाला लागा, विजय आपलाच आहे, मी तुम्हाला मुंबई महानगरपालिका हातात देतो, असा विश्वास राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.
पक्षाची आंदोलन पुस्तिका काढणार
दरम्यान, राज ठाकरेंनी सुरुवातील भाषणात बोलताना, मनसेच्या आंदोलनाचा आपला स्ट्राईक रेट उत्तम आहे. म्हणजे यशस्वी आंदोलन झाली आहेत. ते लोकांपर्यंत पोहचवा असं पदाधिकाऱ्यांना सांगितले. निवडणुका होतील तेव्हा होतील, पण तुम्ही कामाला लागा. आमच्या आंदोलनानंतर 62 ते 67 टोल कायमचे बंद झाले. त्यामुळं पक्षाची आंदोलनाची पुस्तिका काढणार आहे, लोकांपर्यंत पक्षांची कामे पोहचवा.
उद्धव ठाकरेंवर टिका
मुंबईत मोर्चा काढताना रझा अकादमीने जो धूडगुस घातला, तेव्हा फक्त मनसैनिकांनी मोर्चा काढला होता. तेव्हा हिंदुत्व करणारे कुठे गेले होते? असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला. तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळी तब्येतीची कारण देऊन घरात बसले होते, आता कायमचेच घरात बसले आहेत. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली. मराठीच्या मुद्दावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्दाववर उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? उद्धव ठाकरेंनी कधीच भूमिका घेतली नाही.
पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात मनसे
पाकिस्तानी कलाकार मुंबईत आले तेव्हा आपण त्यांना येथून हाकलून दिले. त्यानंतर एकही पाकिस्तानी कलाकार दिसला नाही. भोंगे उतरविण्याची बाळासाहेबांची इच्छा होती, ती पूर्ण आपण केली. भोंगे नाही काढले तरी हनुमान चालिसा लावू असं म्हटल्यावर सगळे भोंगे खाली उतरले. अजूनही संपूर्ण भोंगे उतरले नाहीत, जिथे-जिथे भोंगे सुरु असतील तिथे पहिल्यांदा पोलिसात तक्रार करा. पोलिसांनी जर तक्रार घेतली नाही तर पोलिसांवर कारवाई होऊ शकते. त्यानंतर हनुमान चालिसा लावा, मनसैनिकांकडून आरेला-कारे म्हटलंच पाहिजे. असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
रेल्वेच्या एका आंदोलनामुळं हजारो मुला-मुलींना नोकऱ्या
माझी भूमिका यूपी-बिहारच्या विरोधात नाही तर, त्यावेळी तिथून आलेल्या लोकांसाठी माझे आंदोलन होते, परराज्यातून येऊन तुम्ही येथे नोकरी मिळवता, आणि माझ्या मराठी मुलाला हाती कामं नाही हे चालणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटले. रेल्वेच्या एका आंदोलनामुळं महाराष्ट्रातील हजारो मुला-मुलींना नोकऱ्या मिळाल्या. उत्तरपत्रिका मराठीत आली हे आपले यश आहे. आज राज्यातील उद्योग-धंदे बाहेरच्या राज्यात जात आहेत. ज्या-ज्या राज्यात मागासलेपणा आहे, तिथे उद्योगधंदे गेले तरी काही वाईट नाही. माझी पंतप्रधानांना विनंती आहे की, देशातील प्रत्येक राज्याकडे समानतेनं बघा, फक्त गुजरात करु नका. असं राज ठाकरे म्हणाले.
कोश्यारीचं वय काय? बोलता काय?
काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचा समाचारा राज ठाकरेंनी घेताना कोश्यारींवर जोरदार टिका केली. कोश्यारीचं वय काय? बोलत काय? राज्यपाल पदावर बसला म्हणून मान राखतो. नाहीतर राज्यात शिव्यांची कमतरता नाही. काही दिवसांपूर्वी बोलले होते की, इथले गुजराती, मारवाडी येथून गेले तर, महाराष्ट्रात काय उरले? पण मी म्हणतो तिथून ते का आलेत हे पहिले विचारा, महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नाही. म्हणून ते हिकडे आलेत. महाराष्ट काय आहे हे कोश्यारीकडून ऐकायचे नाही. या सर्वांना सांगितले की तुम्ही परता जा तर जातील का? उद्योगधंद्यासाठी महाराष्ट्र हे पोषक राज्य आहे. पहिले प्राधान्य हे महाराष्ट्राला असते. असं म्हणत कोश्यारींचा राज ठाकरेंनी समाचार घेतला.
राजकारणाचा दर्जा खूप घसरलाय
अलीकडे राजकारणाचा दर्जा खूप खालावला आहे. भाषा कोणती वापरले जाते. मी असा महाराष्ट्र असा कधी पाहिला नाही, असं राज ठाकरे म्हणाले. एक मंत्री एका महिलेला भिकारचोट म्हणतो. असं कधी मी पाहिलो नव्हतो. काय बोलत असतात, काय त्यांची भाषा असते समजत नाहीय. पक्षाचे प्रवक्ते काय बोललात याचे भान नाहीय. तरुण मुलं-मुली जेव्हा टिव्ही बघत असतील तेव्हा त्यांच्या मनावर काय परिणाम होत असतील, याची मला भीती वाटते. साधू संतांनी हे संस्कार केले होते का? असा महाराष्ट्र बघायचा का? आज राज्यातून अनेक मुलं-मुली बाहेरच्या राज्यात नोकरीसाठी जातात. कारण म्हणजे जातीपातीचं कलुषित झालेलं वातावरण. हे नकोच म्हणून बाहेर जातायेत. सध्याचे तरुण राजकारणाकडे दुर्लक्ष करताहेत. अनेक मुलं-ली तसेच देशातील अनेक उद्योगपती देश सोडून बाहेर जाताहेत. पाच लाख उद्योगपती देश सोडून बाहे गेले आहेत. महापुरुषांची बदनामी करणं एवढच आपण करतोय
राहुल गांधींची लायकी आहे का?
राहुल गांधी बोलतात की, आरडी बर्मन बोलते तेच कळत नाही. आरे गधड्या तुझी लायकी आहे का, सावरकरांवर बोलायची? काय माहिती तरी आहे का? सावरकरांबद्दल कुठे ठेवले, काय हालअपेष्टा काढल्या. काहीही बोलायचे, राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा, आमची कृष्णनिती काय सांगते की, एखादी चांगली गोष्ट होणार असेल तर त्यासाठी खोटं बोललं तरी चालेल, पण ती चांगली गोष्ट झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील रणनितीचा वापर केला होता. मला वाटत काही गोष्टी थांबणं गरजेचं आहे.
महापुरुषांची बदनामी करणं थांबवा
थोर पुरुषांची बदनामी करणं थांबावा आता. मला सर्व पक्षांना म्हणजे काँग्रेससह भाजपाने देखील महापुरुषांवर बोलणं थांबवले पाहिजे. जवाहरलाल नेहरुंची बदनामी थांबवली पाहिजे, फोटो व्हायरल करुन नेहरुंची बदनामी केली जात आहे. दोन्हीकडून देखील बस्स झाले आता. याव्यतिरिक्त अनेक प्रश्न आहेत, रोजगार, शेती, सुरक्षितता असं विषय असताना आम्ही ऐकमेकांची बदनामी करतोय. हे थांबले पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी पु. ल. देशपांडे यांच्या अंतूबर्वा या पुस्तकातील पात्राचा दाखला दिला. अंतूबर्वासारखे झाले आहे. आजही चारही बाजूंनी चिखलफेक होत आहे, नवोदित पिढिसमोर कोणता आदर्श आपण ठेवणार हा खरा प्रश्न आहे. असं राज ठाकरेंनी म्हणच महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर जोरदार प्रहार केला.
…तर मी तुमच्या हातात पालिका देतो
प्रत्येक माणसाला गुणदोषांसह तुम्हाला स्विकारावा लागतो. प्रत्येकवेळी दोष पाहिला तर, काहीच होणार आहे. निवडणुका होतील तेव्हा होतील, पण तुम्हा कामाला लागा, लोकांपर्यंत मनसेची कामे पोहचवा, मी तुम्हाला वचन देतो… ताकदीने कामाला लागा मी तुमच्या हातात मुंबई महानगर पालिका देतो, हा माझा शब्द आहे. लोकांपर्यंत पोहचवा. लोकांची कामे करा, मला तुमच्याकडून गटाध्यक्षांकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण करा, असं म्हणच राज ठाकरेंनी भाषणाच्या शेवटी पालिकेत आपली सत्ता येईल असा आशावाद व विश्वास पदाधिकांऱ्यांना दिला.