Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: गोडोलीच्या वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’; पोवई नाका ते साईबाबा मंदिर परिसर होणार मोकळा

Satara News: गोडोली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या समस्येवर सातारा पालिकेने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून पोवई नाका ते साईबाबा मंदिर तसेच जकात नाका परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे वाहतुकीला दिलासा मिळण्याची आणि रस्ते अधिक मोकळे होण्याची अपेक्षा आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 08, 2026 | 06:43 PM
गोडोलीच्या वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’; पोवई नाका ते साईबाबा मंदिर परिसर होणार मोकळा

गोडोलीच्या वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’; पोवई नाका ते साईबाबा मंदिर परिसर होणार मोकळा

Follow Us
Follow Us:
  • गोडोलीच्या वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’
  • पालिकेची सोमवारपासून धडक कारवाई
  • पोवई नाका ते साईबाबा मंदिर परिसर होणार मोकळा
सातारा : गोडोली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अरुंद होत चाललेले रस्ते यावर आता सातारा नगरपालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी सोमवार, दि. १० ऑगस्टपासून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. या कारवाईमुळे गोडोली परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोवई नाका ते साईबाबा मंदिर, गोडोली नाका तसेच गोडोली जकात नाका परिसरात रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे. त्यातच पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या मार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा भार पर्यायी मार्गांवर आला आहे. परिणामी गोडोली चौक आणि परिसरात विशेषतः सकाळी व सायंकाळी वाहनांच्या रांगा लागत आहेत.
या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शनिवारी गोडोली परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. साईबाबा मंदिर, गोडोली नाका तसेच सदर बाजार कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गाची पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींची माहिती घेण्यात आली.

Animal Husbandry Committee Satara: पशुधनाचा विमा काढा अन् योजनांचा लाभ घ्या; वाघोलीत पशुपालकांची बैठक पार

अतिक्रमणे, रस्त्यावरील अनधिकृत अडथळे आणि वाहतुकीच्या नियोजनाचा यावेळी आढावा घेण्यात आला. गोडोली परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि व्यापारी आस्थापना मोठ्या प्रमाणावर असल्याने या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावरील अडथळे हटविणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अतिक्रमणामुळे वाहनांसोबतच पादचाऱ्यांनाही अनेकदा रस्त्यावरूनच मार्ग काढावा लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत आहे.

पालिकेच्या कारवाईत केवळ अतिक्रमणे हटविण्यावर भर न देता या भागातील वाहतूक व्यवस्थेचे दीर्घकालीन नियोजन करण्याचेही ठरविण्यात आले आहे. रस्त्याची उपलब्ध रुंदी कायम ठेवणे, वाहतुकीला अडथळा ठरणारे घटक दूर करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक नियमनात बदल करण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत.

कारवाईपूर्वी अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन

रस्ते व सार्वजनिक जागा अडवून व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी तसेच संबंधित व्यावसायिकांनी प्रशासनाच्या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. कारवाईची वेळ येण्यापूर्वी स्वतःहून अतिक्रमणे व अडथळे दूर करावेत, अन्यथा पालिकेकडून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.

गोडोलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम असून, सोमवारपासून होणाऱ्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अतिक्रमणे हटविल्यानंतर रस्ते मोकळे होऊन वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी ही मोहीम सातत्याने राबविणे आणि पुन्हा अतिक्रमणे होऊ न देणे, हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.

या पाहणीवेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, सभापती अशोक शेडगे, नगरसेवक फिरोज पठाण, विनोद मोरे, रवी पवार, नगरसेविका अनिता फरांदे, पूनम निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नरभट, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, शहर विकास विभागाचे नगररचनाकार तुषार मदने, क्षितिज शिंदे, नगरपालिका बांधकाम विभागाचे विनोद दहिफळे, अतिक्रमण विभागप्रमुख प्रशांत निकम यांच्यासह अधिकारी, वाहतूक पोलीस व नगरसेवक उपस्थित होते.

वाई शहरात साथीच्या रोगांचे सावट, नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त

Web Title: Godoli satara traffic congestion encroachments removal municipal action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Traffic

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.