(फोटो सौजन्य-AI एआय)
शेताच्या बांधावर पाडसावर हल्ला
बघोली परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी, शेतशिवार आणि नैसर्गिक अधिवास असल्याने वन्यप्राण्यांचा वावर दिसून येतो. सोमवारी दुपारी एक हरणाचे पाडस शेताच्या बांधावर चरत होते. त्याच वेळी 3 ते 4 भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. काही वेळातच कुत्र्यांनी पाडसाला घेरून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पाडसाला चावा लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्याच्या अंगावरून रक्त वाहू लागले.
Tiger News: सह्याद्रीच्या खोऱ्यात घुमणार ‘हिरकणी’ची डरकाळी; व्याघ्र संवर्धनाला नवे बळ
आक्रोश ऐकून चिमुकले धावले
याच दरम्यान कुणाल आणि नेहुल हे दोघे शेताकडे जात होते. त्यांना पाडसाचा आक्रोश ऐकू आला. परिस्थिती लक्षात येताच त्यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. दोघांनी काठ्या हातात घेत आरडाओरड करून कुत्र्यांना पाडसापासून दूर केले. त्यांच्या प्रतिकारामुळे अखेर भटक्या कुत्र्यांनी तेथून पळ काढला.
जखमी पाडसाला दिली मदत
कुत्र्यांचा धोका दूर झाल्यानंतर दोन्ही मुलांनी जखमी पाडसाला सुरक्षित ठिकाणी आणले. त्याला पाणी पाजून जखमेवर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. वेळीच मदत मिळाल्याने जखमी पाडसाची काळजी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली.
Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश
चिमुकल्यांच्या धाडसाचे कौतुक
या घटनेत कुणाल आणि नेहुल यांनी दाखवलेले धाडस आणि वन्यजीवांबद्दलची संवेदनशीलता विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. स्वतःचा धोका न पत्करता परिस्थितीचा अंदाज घेत त्यांनी कुत्र्यांना दूर केले आणि पाडसाला मदत मिळवून दिली. त्यांच्या या कृतीचे बघोलीसह परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.






