‘हिरकणी’ची मुक्तता (फोटो- सोहाळ मीडिया)
सह्याद्रीच्या खोऱ्यात घुमणार हिरकणीची डरकाळी
हिरकणीला कोयना अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात निसर्गमुक्त
वन्यजीव संवर्धनाला नवी चालना मिळणार
पुणे: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या ‘एसटीआर ०६’ या वाघिणीला शनिवारी (ता. ७) पहाटे ६ वाजता कोयना अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले. वन्यजीव प्रेमींनी या वाघिणीचे ‘हिरकणी’ असे नामकरण केले आहे. ‘बाजी’ या नर वाघानंतर ‘हिरकणी’च्या आगमनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाला नवी चालना मिळणार आहे.
‘हिरकणी’ ही वाघीण मूळची पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातील आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तिला जेरबंद करण्यात आले आणि त्यानंतर रस्तेमार्गे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे हलविण्यात आले. शुक्रवारी रात्री बोटीने प्रवास करून तिला कोयना अभयारण्यात आणण्यात आले. आगमनानंतर वनविभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची सखोल आरोग्य तपासणी केली. देण्यात आलेले पाणी व खाद्य तिने स्वीकारल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
कोयनेच्या जंगलात घुमतेय ‘बाजी’ची डरकाळी! चांदोली परिसरात सेनापती-सुभेदाराचा दबदबा
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यापूर्वीच ‘एसटीआर ०३’ (बाजी) हा नर वाघ वास्तव्यास आहे. आता ‘एसटीआर ०६’ (हिरकणी)च्या आगमनामुळे कोयना परिसरात वाघांची वंशवृद्धी होण्याची शक्यता वाढली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या सुमारे ११६५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ही घटना मैलाचा दगड ठरणार असल्याचे मानले जात आहे. भविष्यात यामुळे व्याघ्र पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ही संपूर्ण कारवाई सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के, परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडसे (फिरते पथक), अक्षय साळुंखे (कोयना), विजय बाटे (बामणोली), तुषार जानकर (पाटण), अक्षय करमळकर (कांदाट), मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनील भोईटे तसेच वनपाल आणि वनरक्षकांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.
यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….
‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर
सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघांची नैसर्गिक संख्या पुन्हा स्थिर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या ‘वाघ पुनर्स्थापना प्रकल्पा’ला मोठे यश मिळाले असून, ‘सेनापती’ हा नर वाघ आणि ताडोबा येथून स्थलांतरित करण्यात आलेली ‘चंदा’ ही वाघीण एकत्रितपणे वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चांदोली वन्यजीव विभागातील आंबा वनपरिक्षेत्रात हा वावर कॅमेरा ट्रॅप आणि प्रत्यक्ष निरीक्षणातून नोंदविण्यात आला आहे.






