Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना १ हेक्टर जमीन, १ लाखांचे अनुदानही मिळणार, काय आहे नवी योजना?

Chandrashekhar Bawankule : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली असून, महिला बचत गटांना १ हेक्टर जमीन देण्यासोबतच १ लाख रुपयांचे अनुदान देण्याची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती देत, या उपक्रमातून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल....

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 16, 2026 | 03:43 PM
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना १ हेक्टर जमीन, १ लाखांचे अनुदानही मिळणार, काय आहे नवी योजना? (फोटो सौजन्य-ChatGPT)

महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना १ हेक्टर जमीन, १ लाखांचे अनुदानही मिळणार, काय आहे नवी योजना? (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा!
  • बचत गटांना १ हेक्टर जमीन, १ लाखांचे अनुदानही मिळणार
  • काय आहे नवी योजना?
Maharashtra Women Scheme News Marathi : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला बचत गटांना (Mahila Bachat Gat) १ हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यासोबतच १ लाख रुपयांचे अनुदान देण्याची नवी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महिलांना स्वावलंबी बनवणे, ग्रामीण भागात उद्योग-व्यवसाय वाढवणे आणि बचत गटांच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून ही मोठी पाऊले उचलली जात आहेत.

जन्म-मृत्यू नोंदणीचा केंद्रीय सर्व्हर ठप्प! जिल्ह्यात दाखला वितरण खोळंबले; पूर्वसूचना नसल्याने फरफट

काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

या योजनेअंतर्गत महिलांना पाच वर्षांसाठी जमीन वापरासाठी दिली जाणार आहे. या जमिनीवर चारा लागवड, नेपियर गवत, बांबू शेती तसेच ग्रासलँड डेव्हलपमेंटसारखे उपक्रम राबवता येणार आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती वाढवणे आणि महिलांचे उत्पन्न वाढवणे हा सरकारचा उद्देश आहे. याशिवाय, बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान देखील देण्यात येणार आहे. या आर्थिक मदतीमुळे महिलांना सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी आधार मिळेल आणि व्यवसाय उभारणी सोपी होईल.

तसेच अडीच एकर जमिनीवर चारा किंवा बांबूची योग्य प्रकारे लागवड केल्यास, महिला बचत गटांना वार्षिक ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते, असा दावा सरकारने केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या जमिनीतून मिळणाऱ्या संपूर्ण नफ्यावर आणि उत्पन्नावर केवळ संबंधित महिला बचत गटाचाच अधिकार असेल; त्यावर सरकार कोणताही दावा करणार नाही. मात्र ही जमीन महिला बचत गटांना कायमची दिली जाणार नाही. पाच वर्षांच्या लीजवर दिली जाणार आहे.

उत्पन्न थेट बचत गटालाच

या योजनेतून मिळणारे उत्पन्न थेट संबंधित महिला बचत गटालाच मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महिलांना नियमित आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल.

पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश

रोजगारनिर्मितीला चालना

राज्यातील अनेक महिला बचत गट विविध व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. मात्र, जागेची कमतरता आणि आर्थिक मर्यादांमुळे अनेक उपक्रमांना गती मिळत नाही. शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती वाढण्यास मदत होईल. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. महिलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर उद्योजकतेच्या दिशेने सक्षम करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असून, ही योजना त्यातील एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.

Web Title: Government big announcement for women shg 1 hectare land 1 lakh grant bawankule plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • maharashtra

संबंधित बातम्या

FDA Raid: नॉन-फूड ग्रेड तेलाचा वापर करून तूप-पनीर निर्मिती? अमोल दूध डेअरीवर छापा, छत्रपती संभाजीनगरमधून ठा साठा जप्त
1

FDA Raid: नॉन-फूड ग्रेड तेलाचा वापर करून तूप-पनीर निर्मिती? अमोल दूध डेअरीवर छापा, छत्रपती संभाजीनगरमधून ठा साठा जप्त

Gondiya News: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी! बिबिटोलातील घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा
2

Gondiya News: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी! बिबिटोलातील घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा

Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील तरुण बांगलादेशातील कारागृहात; राष्ट्रीयत्व पडताळणीसाठी पोलिसांची धावपळ
3

Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील तरुण बांगलादेशातील कारागृहात; राष्ट्रीयत्व पडताळणीसाठी पोलिसांची धावपळ

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश; आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित
4

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश; आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.