Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी! बिबिटोलातील घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा

बीबीटोला येथे शेतात काम करणाऱ्या पृथ्वीराज अंबुले या शेतकऱ्यावर मादी बिबट्याने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावून गस्त वाढवली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 04, 2026 | 05:37 PM
Gondiya News: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी! बिबिटोलातील घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा
Follow Us
Follow Us:
  • बीबीटोला येथे शेतात काम करणाऱ्या पृथ्वीराज अंबुले नावाच्या शेतकऱ्यावर मादी बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.
  • काही दिवसांपूर्वी वनविभागाने बिबट्याच्या दोन पिल्लांना सोडल्याने मादी बिबट्या आपल्या बछड्यांसह या परिसरात वावरत होती.
  • वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असून ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील बीबीटोला येथे सोमवारी एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. जखमी शेतकऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पृथ्वीराज अंबुले (रा. बीबीटोला) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी परिसरात बिबट्याची दोन पिल्ले आढळली होती. ग्रामस्थांनी ती पिल्ले तात्पुरती ताब्यात घेतली होती. त्यानंतर वनविभागाने ती पिल्ले ताब्यात घेऊन पुन्हा जंगलात सोडली होती.

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मात्र, त्यानंतर मादी बिबट्या आपल्या दोन्ही बछड्यांसह परिसरात पुन्हा दिसू लागल्याची माहिती आहे. सोमवारी पृथ्वीराज हे आपल्या शेतात काम करत असताना मादी बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर व खांद्यावर गंभीर जखमा झाल्या.

स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Gondiya: काँक्रिटच्या रस्त्यावर डांबराची मलमपट्टी! राज्यमार्गाची समस्या; ७५ कोटींच्या रस्त्यावर ‘थातूरमातूर’ काम

बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी

मादी बिबट्या व तिचे दोन्ही बछडे बीबीटोला, नहरटोला आणि सोनेगाव परिसरात वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकटे घराबाहेर पडू नये, तसेच सकाळी व सायंकाळी शेतात किंवा जंगलालगतच्या परिसरात जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Farmer injured in leopard attack at bbitola village gondiya maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • farmer
  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.