Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश; आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

 आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या फिल्टर प्लांट आणि पाण्याच्या टाकीसाठी लागणारी सुमारे साडेतीन एकर जागा "गुड ऑफ सर्व्हंट" संस्थेने नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2026 | 04:59 PM
आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश; आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश; आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ/ सतिश गाडे : तळेगाव दाभाडे शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आंध्र धरण पाणीपुरवठा योजनेला मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र (फिल्टर प्लांट) आणि पाण्याच्या उंच टाकीसाठी लागणारी सुमारे साडेतीन एकर जागा “गुड ऑफ सर्व्हंट” संस्थेने नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली असून, या जागेची सरकारी मोजणी नुकतीच पूर्ण करण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

या प्रकल्पासाठी आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने राज्य शासन, संबंधित विभाग तसेच विविध संस्थांशी पाठपुरावा करून आवश्यक मंजुरी आणि जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी सांगितले की, तळेगाव दाभाडे शहराची वाढती लोकसंख्या, नव्याने उभारल्या जाणाऱ्या गृहनिर्माण योजना, औद्योगिक विकास आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत आहे. आगामी अनेक दशकांचा विचार करून या योजनेची क्षमता निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत आंध्र धरणातून तळेगाव शहरासाठी दरवर्षी ५.०९४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. दररोज २२ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात येणार असून, १५ लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी तसेच २० दशलक्ष लिटर क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्यावर प्रक्रिया करून नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार पाणीपुरवठा केला जाणार आहे.

सध्या उन्हाळ्यात शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून, काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील विविध भागांना नियमित, मुबलक आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होणार असून, भविष्यातील पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणात भागविली जाणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्याबरोबरच शहराच्या नियोजित विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता ही योजना तळेगावच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

सरकारी मोजणीवेळी “गुड ऑफ सर्व्हंट” संस्थेचे सचिव लाला सर, ॲड. सचिन नवले, नगरसेवक शिवाजी आगळे, निखिल भगत, सत्यम खांडगे, सूरज सातकर, प्रभुलाल तसेच संबंधित अधिकारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. योजनेसाठी आवश्यक जागेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बांधकामाला गती देण्यात येणार असून, प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून तळेगावकरांना शाश्वत व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा मानस असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

हे सुद्धा वाचा : मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! अपघात योजनेला मुदतवाढ, महिला शेतकरी, भूमिहीन मजुरांना दिलासा

Web Title: Work on the andhra dam water project has gained momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sunil Shelke
  • Vadgaon Maval

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.