Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार

उंच मानवी मनोरे रचताना तोल जाणे, पडणे, हात-पायांना फॅक्चर होणे, डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला दुखापत होणे, अशा घटना दरवर्षी घडतात. गंभीर दुखापतींमुळे उपचाराचा खर्चही मोठा असतो. ही बाब लक्षात घेऊन सरावादरम्यान गोविंदांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 27, 2026 | 02:30 PM
आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार

आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार

Follow Us
Follow Us:

दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच राज्यभरातील गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. मानवी मनोरे उभारताना सरावादरम्यान अपघात होण्याच्या घटना लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने यंदा अतिरिक्त सराव करणाऱ्या गोविंदांसाठी विशेष अपघाती विमा योजना जाहीर केली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत प्रत्येक गोविंदाला १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, तर अपघात झाल्यास रुग्णालयीन उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे

दहीहंडीपूर्वी अनेक मंडळे दोन ते अडीच महिने सातत्याने सराव करतात. उंच मानवी मनोरे रचताना तोल जाणे, पडणे, हात-पायांना फॅक्चर होणे, डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला दुखापत होणे, अशा घटना दरवर्षी घडतात. गंभीर दुखापतींमुळे उपचाराचा खर्चही मोठा असतो. ही बाब लक्षात घेऊन सरावादरम्यान गोविंदांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

८८ मे महिन्याच्या अखेरपासून राज्यातील ९० हून अधिक गोविंदा मंडळांनी दहीहंडीचा सराव सुरू केला आहे. प्रो-गोविंदामुळे स्पर्धा वाढली असून प्रत्येक मंडळ अधिक सुरक्षित आणि भक्कम मानवी मनोरे उभारण्यासाठी करून सराव करत आहे. सरावादरम्यानही अपघाताची शक्यता लक्षात घेऊन गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या प्रयत्नांनी ओरीयंटल इंशुरन्स कंपनीशी वाटाघाटी करून ही विशेष विमा योजना सुरू केली आहे, असे मत बाळा पडेलकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांनी मांडले आहे.

या योजनेचा कालावधी ७५ दिवसाचा असून, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत विमा संरक्षण लागू राहणार आहे. १४ ते ७० वर्षे वयोगटातील गोविंदांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ७१ ते ७५ वर्षे वयोगटातील प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक सदस्यासाठी ११० रुपये प्रीमियम भरावा लागणार असून, यासाठी मंडळांनी चर्चगेट येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून प्रीमियम भरावा लागणार आहे.

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त

सरावालाही मिळणार संरक्षण

असोसिएशनच्या माहितीनुसार, ही योजना अधिक कालावधीचा सराव करणाऱ्या मंडळांसाठीच लागू आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेपासून दहीहंडी उत्सवापर्यंत स्वतंत्र विमा संरक्षण योजना राबविण्यात येते.मात्र, त्याआधी सुरू होणाऱ्या सरावादरम्यानही गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने ही अतिरिक्त योजना सुरू करण्यात आली आहे. दहीहंडी उत्सवात साहसाइतकेच सुरक्षिततेलाही महत्त्व आहे.त्यामुळे सर्व गोविंदा मंडळांनी या विमा योजनेचा लाभ घेऊन सुरक्षित सरावाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Govindas to get insurance cover during practice sessions too 10 lakh protection for 75 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Dahi Handi
  • Insurance Policy
  • Mumbai News

संबंधित बातम्या

अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना जामीन; साडेपाच वर्षांनंतर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा
1

अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना जामीन; साडेपाच वर्षांनंतर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन
2

Mumbai News: पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
3

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Mumbai News: २,७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन! मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात साठवणूक
4

Mumbai News: २,७५४ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन! मुलुंड येथील तात्पुरत्या केंद्रात साठवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.