Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

प्रशासनाकडून घटनेचा आढावा घेतला जात असून, अद्याप कोणतीही जीवित अथवा मोठ्या वित्तहानीची नोंद झालेली नाही. गेल्या काही दिवसांत नाशिक आणि लगतच्या पालघर परिसरात भूगर्भातील हालचाली वाढल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 14, 2026 | 05:53 PM
Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून

Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

Nashik Earthquake Updates: नाशिकला ३.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

Nashik Earthquake Updates:  नाशिक शहर आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवण्याचे सत्र सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक जिल्हा आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून ठरावीक अंतराने अधूनमधून भूकंपाचे सौम्य ते मध्यम धक्के जाणवत आहेत. अचानक धरती कंपित झाल्याचे जाणवताच अनेक भागांतील नागरिक सुरक्षिततेसाठी तात्काळ घराबाहेर पडले. 

 

The liveblog has ended.
  • 14 Aug 2026 04:55 PM (IST)

    14 Aug 2026 04:55 PM (IST)

    Pakistan-US : इशाक डार यांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश; ‘इस्लामाबाद MoU’ची पूर्ण अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग!

     इस्लामाबादमध्ये अमेरिकेच्या कार्यवाहक राजदूत नताली बेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी 18 जूनच्या इस्लामाबाद MoUच्या पूर्ण अंमलबजावणीवर जोर दिला. संवाद आणि राजनयाच्या माध्यमातून प्रादेशिक शांतता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .

  • 14 Aug 2026 04:53 PM (IST)

    14 Aug 2026 04:53 PM (IST)

    राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

    काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीयांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी संबंधित खटला न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे.. तसेच न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली फौजदारी मानहानीची तक्रार पूर्णपणे फेटाळून लावली. हा निर्णय राहुल गांधींसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. वाचा सविस्तर... 

  • 14 Aug 2026 04:18 PM (IST)

    14 Aug 2026 04:18 PM (IST)

    महाराष्ट्रातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा

    महाराष्ट्रातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात उद्योगांची संख्या वाढत असल्याचा सरकारकडून दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात किती कंपन्या महाराष्ट्रात आल्या आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाले, याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. मुख्यमंत्री 3 जून 2026 च्या आकडेवारीचा हवाला देत महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक उद्योग असल्याचे सांगत आहेत. गेल्या वर्षभरात 41 हजार 500 कंपन्या राज्यात आल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, 2014 नंतर प्रत्यक्षात महाराष्ट्रात किती कंपन्या आल्या? असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

  • 14 Aug 2026 04:07 PM (IST)

    14 Aug 2026 04:07 PM (IST)

    Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

    काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी संबंधित खटला न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे.. तसेच न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली फौजदारी मानहानीची तक्रार पूर्णपणे फेटाळून लावली. हा निर्णय राहुल गांधींसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. वाचा सविस्तर... 

  • 14 Aug 2026 04:00 PM (IST)

    14 Aug 2026 04:00 PM (IST)

    BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी

    BJP Seva Abhiyan Satara District: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  रविंद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिक, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

  • 14 Aug 2026 03:55 PM (IST)

    14 Aug 2026 03:55 PM (IST)

    JP Nadda Health Update: केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा AIIMS मध्ये दाखल; कोरोनरी अँजिओग्राफीसह विविध तपासण्या

    JP Nadda Health Update: केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना अस्वस्थ वाटत होते. यानंतर एम्समध्ये त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. रक्तवाहिन्यांमधील अडथळे शोधण्यासाठी ही चाचणी केली जाते. एम्सने जारी केलेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. सध्या ते हृदयरोग विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

  • 14 Aug 2026 03:45 PM (IST)

    14 Aug 2026 03:45 PM (IST)

    ‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

    जास्त साखर, मीठ आणि सॅचुरेटेड फॅट असलेल्या पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर चेतावणी लेबल लावण्यास भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अनिच्छेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इतकेच नाही तर, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि एफएसएसएआयच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांवर कॉर्पोरेशन्सचा दबाव आहे का, असा प्रश्न विचारला.

  • 14 Aug 2026 03:35 PM (IST)

    14 Aug 2026 03:35 PM (IST)

    Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार

    जागतिक सायबर सुरक्षेच्या इतिहासात एक अत्यंत मोठा आणि अभूतपूर्व धोरणात्मक बदल घडवून आणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एका ऐतिहासिक राष्ट्रीय सुरक्षा आदेशावर (National Security Presidential Memorandum) स्वाक्षरी केली आहे. या नवीन आणि अतिशय कडक सुरक्षा धोरणांतर्गत, अमेरिकेतील निवडक खाजगी कंपन्यांना आता परदेशी सायबर गुन्हेगार, हॅकिंग सिंडिकेट्स आणि रॅन्समवेअर टोळ्यांविरुद्ध थेट सायबर प्रतिहल्ला (Offensive Cyber Operations / Hack Back) करण्याचे कायदेशीर अधिकार देण्यात आले आहेत. आतापर्यंत अशा प्रकारचे गुप्तचर आणि लष्करी स्वरूपाचे सायबर हल्ले फक्त अमेरिकन सैन्य (US Military) आणि सीआयए (CIA) सारख्या गुप्तचर संस्थांपुरतेच मर्यादित होते. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर एक नवीन राजनैतिक आणि तांत्रिक चर्चा सुरू झाली आहे.

  • 14 Aug 2026 03:25 PM (IST)

    14 Aug 2026 03:25 PM (IST)

    ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

    शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने फूट पडली, ती संविधानाच्या चौकटीत बसणारी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

  • 14 Aug 2026 03:23 PM (IST)

    14 Aug 2026 03:23 PM (IST)

    ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

    शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने फूट पडली, ती संविधानाच्या चौकटीत बसणारी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने फूट पाडण्यात आली, ती योग्य नाही. या संपूर्ण प्रक्रियेबाबत विरोधकांनाही आणि आम्हालाही वस्तुस्थिती माहिती आहे. निवडणूक आयोगासारख्या संस्थेचा अशा प्रकारे वापर होणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले.

  • 14 Aug 2026 03:14 PM (IST)

    14 Aug 2026 03:14 PM (IST)

    Breaking: स्वातंत्र्यदिनाआधी दिल्लीत खळबळ!; IGI विमानतळ आणि उच्च न्यायालयात बॉम्बच्या धमक्या

    IGI Airport Terminal 3 Bomb Threat:  स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी, राजधानी दिल्लीतील अनेक ठिकाणी बॉम्बच्या धमक्यांचे फोन आले आहेत. जामा नगर हाऊस, झंडेवालन बिल्डिंग, एम. बी. साकेत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आयजीआय विमानतळाचे टर्मिनल ३ आणि दिल्ली कँटोन्मेंटमधील एसडीएम कार्यालयासह पाच ठिकाणी बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. फोन आल्यानंतर लगेचच बॉम्ब पथक, पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सक्रिय करण्यात आले.या ठिकाणी व्यापक शोध घेण्यात आला, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, अशी माहिती दिल्ली अग्निशमन विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

  • 14 Aug 2026 02:45 PM (IST)

    14 Aug 2026 02:45 PM (IST)

    व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत खोटे सांगितले? हृदयरोगतज्ज्ञांचा दावा

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरून सुरू असलेला राजकीय वाद आता एका नव्या वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांच्यावर तब्बल २७ वर्षे वैद्यकीय उपचार करणारे आणि अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जोनाथन रायनर यांनी ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत व्हाईट हाऊसने दिलेल्या वैद्यकीय स्पष्टीकरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. द न्यू यॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका विशेष लेखात त्यांनी ट्रम्प यांच्या हातांवर दिसणाऱ्या जखमांच्या खुणा, पायांना आलेली सूज आणि अनेक कार्यक्रमांमध्ये दिसलेली अस्वस्थता याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.

  • 14 Aug 2026 02:35 PM (IST)

    14 Aug 2026 02:35 PM (IST)

    Dead Money च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क

    गुंतवणूकीकडे लोकांचा ओघ वाढला आहे. पण नेमकी कुठे गुंतवणूक केली जाते पैसा सुरक्षित आहे की नाही या पेक्षा Dead Money सारखा धोकाही संभवतो. अनेकदा लोकं अशा ठिकाणी पैसे गुंतवतात ( Investment Rules ) जिथे कागदावर तर संपत्ती भली मोठी वाढलेली दिसते. पण आणीबाणीच्या वेळी किंवा गरज असताना जेव्हा पैसा हवा असतो तेव्हा तो हातात येत नाही. अशी परिस्थिती तुमच्यासोबतही घडू शकते. नेमकी काय आहे ही परिस्थिती याला Dead Money का म्हणतात. अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नयेत म्हणून काय करायला हवं?

  • 14 Aug 2026 02:25 PM (IST)

    14 Aug 2026 02:25 PM (IST)

    फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

    कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार समोर आला आहे. फ्रॅक्चर झालेल्या एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावण्यात आल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

  • 14 Aug 2026 02:15 PM (IST)

    14 Aug 2026 02:15 PM (IST)

    स्वातंत्र्यदिनाआधी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पोलिसांवर भीषण हल्ला

    पाकिस्तानचा ( Pakistan ) स्वातंत्र्यदिन साजरा होण्याच्या काही तास आधीच लाहोर शहरात एकापाठोपाठ एक घडलेल्या दोन भीषण गोळीबाराच्या घटनांमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. पोलिसांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये तीन निष्पाप पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या रक्तरंजित घटनेनंतर लाहोर पोलीस आणि निमलष्करी दलांनी संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी केला असून सर्व प्रमुख रस्ते, चौक व सीमा नाके बंद करून संशयित हल्लेखोरांची धरपकड सुरू केली आहे.

  • 14 Aug 2026 01:55 PM (IST)

    14 Aug 2026 01:55 PM (IST)

    आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज

    डेटिंग ॲप बंबलने त्यांच्या सर्वात लोकप्रिय फीचरमध्ये एक मोठा बदल केला आहे. कंपनीने घोषणा केली आहे की आता मॅच झाल्यानंतर चॅट सुरू करण्यासाठी महिलांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. या नव्या अपडेटनंतर आता पुरुषा आणि महिला दोन्हीपैकी कोणीही पहिले चॅट सुरू करू शकतात. बंबलने 2014 मध्ये त्यांच्या सुरुवातीच्या काळात अशाच प्रकारच्या वेगळ्या नियमासह आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

  • 14 Aug 2026 01:06 PM (IST)

    14 Aug 2026 01:06 PM (IST)

    लाडक्या बहिणींना राज्य सरकार देणार 50000 रुपये?

    महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेचे कौतुक केले जात आहे. त्यातच आता या योजनेच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात नवीन योजना आणली जाण्याची शक्यता आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात महिला मतदारांसंदर्भातील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. सरकार महिलांसाठी एका योजनेचा विचार करत आहे, जी लागू झाल्यास राज्यातील लाखो महिला मतदारांवर थेट परिणाम करू शकते.

  • 14 Aug 2026 01:02 PM (IST)

    14 Aug 2026 01:02 PM (IST)

    गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात

    गंभीर गुन्ह्यातील तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई तसेच गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुविख्यात गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. पत्नीला भेटण्यास आल्यानंतर त्याला पकडण्यात यश आले आहे. खिडकीतून उडी मारून पळून जाताना थरारकरित्या त्याला पकडण्यात आले. संतोष अनंत धुमाळ (रा. इंदिरा शंकर नगरी, पौड रोड, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

  • 14 Aug 2026 12:48 PM (IST)

    14 Aug 2026 12:48 PM (IST)

    पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट

    उच्चभ्रू आणि वर्दळीच्या पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर मध्यरात्री मद्यधुंद तरुणांनी भरधाव कारच्या मागील खिडक्यांमधून शरीर बाहेर काढत हातात बियरच्या बाटल्या उंचावत आरडाओरडा करत जीवघेणा स्टंट करून धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. पाच तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीस दिली. हे तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. ही घटना दिनांक १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास घडली आहे.

  • 14 Aug 2026 12:36 PM (IST)

    14 Aug 2026 12:36 PM (IST)

    पुण्यात तरुणाचा खून

    पुण्याचा मध्यभाग असलेल्या गणेश पेठ परिसरात वडापाव खरेदीसाठी गेल्यानंतर पायाला धक्का लागल्यावरून वाद झाल्यानंतर तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश पेठेतील डुल्या मारूती चौक परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 14 Aug 2026 12:24 PM (IST)

    14 Aug 2026 12:24 PM (IST)

    दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक केली. राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत इककळकी याची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 14 Aug 2026 12:12 PM (IST)

    14 Aug 2026 12:12 PM (IST)

    माजी उपमुख्यमंत्री बांदल यांच्यावरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट

    शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखवीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ हल्ला झाला होता. सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या देखील होत्या. सुखवीर सिंह बादल यांच्यावर हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणी नांदेडच्या मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या जसपाल सिंग याच्या पुण्यातील निवासस्थानावर जाऊन पुणे पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी माहिती घेतली. पूलगेट परिसरातील त्याच्या घरासह वकिलीच्या कार्यालयाचीही माहिती घेतली, असल्याचे सांगण्यात आले आहे. बादल यांच्यावर गुरुवारी दुपारी नांदेड येथे हल्ला झाला. हा हल्ला मूळचा पुण्यातील असलेला जसपाल सिंग याने केल्याचे समोर आले. त्याला अटक देखील केली आहे.

  • 14 Aug 2026 11:59 AM (IST)

    14 Aug 2026 11:59 AM (IST)

    चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व वाहतूक सुविधांच्या कामांना गती देण्याच्या सूचना

    चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील कंपनीच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तसेच औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध रस्त्यांची संयुक्त पाहणी केली. यावेळी एमआयडीसी अंतर्गत रस्ते, तळेगाव-चाकण महामार्ग तसेच पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

  • 14 Aug 2026 11:53 AM (IST)

    14 Aug 2026 11:53 AM (IST)

    येरवडा येथील राज चौकात दोन गटांमध्ये जोरदार मारामारी

    येरवडा येथील राज चौक परिसरात दोन गटांमध्ये जोरदार मारामारी सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनाही अंधाधुंद मारहाणीत दुखापत झाली. घटनेनंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत.

  • 14 Aug 2026 11:48 AM (IST)

    14 Aug 2026 11:48 AM (IST)

    राहुल गांधींनी उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली

    राहुल गांधींनी गुरुवारी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टोलेबाजी केली. मोदींचं परराष्ट्र धोरण कसं आहे, हे दाखवताना राहुल यांनी मंचावरच काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांची गळाभेट घेतली. गळाभेट घेणे हे यांचे परराष्ट्र धोरण आहे, असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी आणि दीक्षित यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा होत आहे.

  • 14 Aug 2026 11:39 AM (IST)

    14 Aug 2026 11:39 AM (IST)

    मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

    आज पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक

    पुण्यातील मनसे शहराध्यक्ष अनेक पदाधिकारी यांच्या जबाबदारीमध्ये बदल करण्याची बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

    राज ठाकरे घेणार शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

    गेल्या अनेक दिवसात मनसेमध्ये फेरबदल होणार असल्याची चर्चा होती,मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून आज महत्त्वाची बैठक होणार आहे

  • 14 Aug 2026 11:26 AM (IST)

    14 Aug 2026 11:26 AM (IST)

    कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणातआरोपींचा शोध सुरू

    कुंभमेळ्यातील कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी जामनेरमधील दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, आणखी पाच ते सात जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

  • 14 Aug 2026 11:13 AM (IST)

    14 Aug 2026 11:13 AM (IST)

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहराची वाट लागली - आदित्य ठाकरे

    सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहराची वाट लागली आहे. त्यावर साधू महंतांनी ही या कामांची गरज आहे का? असा प्रश्न केला. याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. हा सर्व जनतेचा पैसा आहे. नासाडी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • 14 Aug 2026 11:07 AM (IST)

    14 Aug 2026 11:07 AM (IST)

    दहावीच्या पोरांना वेठीस धरणारा हा आहे 'जगातील सर्वात मोठा पक्ष', दानवेंचा टोला

    छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थ्यांना आणून त्यांचे मोबिलायझेशन केले जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर केला आहे. दानवे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "दहावीच्या पोरांना वेठीस धरणारा हा आहे 'जगातील सर्वात मोठा पक्ष'! छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर उधारीचे दंड फुगवायला इयत्ता दहावीचे मुलं कार्यक्रमासाठी दुपारी १२ पासून क्रांती चौकात आणून बसवले जाणार आहेत. ही फक्त एकाच शाळेची यादी, अगदी मोबाईल नंबर सहित. मुलांच्या करिअरचं, परीक्षेचं काय व्हायचं ते होवो.. साहेबांसमोर गर्दीचा फुगा कसा फुगवायचा एवढाच काय तो येथील भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'!", अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

  • 14 Aug 2026 10:55 AM (IST)

    14 Aug 2026 10:55 AM (IST)

    गॉलमध्ये पाऊस फिरवणार सामन्यावर ‘पाणी’, वाढवली भारतीय संघाची चिंता

     भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळला जाईल. दोन सामन्यांची ही मालिका १५ ऑगस्ट रोजी सुरू होईल. हा सामना गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ नऊ वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी सामना खेळणार आहे.

  • 14 Aug 2026 10:45 AM (IST)

    14 Aug 2026 10:45 AM (IST)

    इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान

    राणी मुखर्जीला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) येथे अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अविस्मरणीय व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या राणी यांच्या अभिनय कारकिर्दीचा आणि जगभरातील प्रेक्षकांशी त्यांनी निर्माण केलेल्या भावनिक नात्याचा या विशेष गौरवातून सन्मान करण्यात आला.

  • 14 Aug 2026 10:35 AM (IST)

    14 Aug 2026 10:35 AM (IST)

    एक सेल्फी, एक AI Prompt आणि तयार होईल 15 ऑगस्टचा भन्नाट फोटो

    स्वातंत्र्य दिनाचा उत्साह संपूर्ण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया यूजर्स देशभक्तीच्या रंगात रंगून गेले आहेत. यानिमित्ताने तुम्ही तुमच्या एका साध्या सेल्फीला एका सुंदर आणि देशभक्तीपर पोर्ट्रेटमध्ये रूपांतर करायचे असेल तर आता कोणत्याही कठीण किंवा महागड्या फोटो-एडिटिंग सॉफ्टवेयरची गरज नाही. तुम्ही चॅटजीपीटी किंवा जेमिनीसारख्या मोफत एआय टूल्सच्या मदतीने अगदी सहज तुमचा फोटो तयार करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ एआय टूल ओपन करून तुमचा फोटो आणि प्रॉम्प्ट शेअर करायचा आहे. आता आम्ही तुम्हाला अशाच प्रॉम्प्ट्सबद्दल सांगणार आहोत.

  • 14 Aug 2026 10:25 AM (IST)

    14 Aug 2026 10:25 AM (IST)

    गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित; पोलिस अधीक्षकांच्या उपस्थिती

    आगामी गणेशोत्सव शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समिती व पोलिस प्रशासनाची संयुक्त समन्वय बैठक गुरुवारी (दि. १३) पार पडली. जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गणेश आगमन सोहळ्यासाठी २९, ३० ऑगस्ट व ८, ९ आणि ११ सप्टेंबर या पाच तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

  • 14 Aug 2026 10:15 AM (IST)

    14 Aug 2026 10:15 AM (IST)

    निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले: कपिल सिब्बलांचा युक्तीवाद

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (सीईसी) चुकीच्या निर्णयामुळे अपात्र एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे पक्षविरोधी आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र असूनही, त्यांना केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारावर मुख्यमंत्रिपद देण्यात आल्याचा धाडसी दावा त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर कोणताही वाद निर्माण झाला असता, पक्षाची नोंदणी रद्द करण्यात आली नाही उलट शिंदे यांना शिवसेनेचे नाव आणि चिन्ह देण्यात आले. निवडणूक आयोगाचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नव्हता, परंतु आयोगाने एकनाथ शिंदे यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकारक्षेत्राची मर्यादा ओलांडली. शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी गुरुवारी सडेतोड युक्तिवाद मांडला.

     

  • 14 Aug 2026 10:05 AM (IST)

    14 Aug 2026 10:05 AM (IST)

    Maharashtra Weather Updates: राज्यात श्रावण सरींचा जोर; कोकण, घाटमाथा अन् विदर्भाला पावसाचा 'येलो अलर्ट'

    Maharashtra Weather Updates:  महाराष्ट्रात श्रावण सरींचा जोर कायम असून आज कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भ भागात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. हवामानाची बिकट परिस्थिती पाहता संबंधित जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी भागांतील जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व पर्यटकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • 14 Aug 2026 09:59 AM (IST)

    14 Aug 2026 09:59 AM (IST)

    Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान

    Rani Mukerji: राणी मुखर्जीला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) येथे अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अविस्मरणीय व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या राणी यांच्या अभिनय कारकिर्दीचा आणि जगभरातील प्रेक्षकांशी त्यांनी निर्माण केलेल्या भावनिक नात्याचा या विशेष गौरवातून सन्मान करण्यात आला.

    भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक असलेल्या राणी मुखर्जीने विविध प्रकारच्या चित्रपटांमधून तसेच हिंदी सिनेमातील अनेक संस्मरणीय महिला व्यक्तिरेखांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रूढींना आव्हान देणाऱ्या महिलांपासून ते प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सामर्थ्याचा शोध घेणाऱ्या व्यक्तिरेखांपर्यंत, राणी यांच्या अभिनयात भावनिक खोली, आत्मविश्वास आणि प्रेक्षकांशी सहज जोडले जाण्याची क्षमता सातत्याने दिसून आली आहे.

  • 14 Aug 2026 09:30 AM (IST)

    14 Aug 2026 09:30 AM (IST)

    Kusal Mendis Coach Death: श्रीलंकेच्या क्रिकेटविश्वावर शोककळा; कुसल मेंडिसचे बालपणीचे प्रशिक्षक सुमित फर्नांडो यांचे निधन

    Kusal Mendis Coach Death:  भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत असतानाच, श्रीलंकेच्या क्रिकेट जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुसल मेंडिस याला शालेय स्तरावर क्रिकेटचे धडे देणारे प्रशिक्षक सुमित फर्नांडो (Sumith Fernando) यांचे एका क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादानंतर निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे श्रीलंकेच्या संपूर्ण क्रिकेट वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना ८ ऑगस्ट रोजी कोलंबो येथे एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान घडली. सामन्यादरम्यान पिण्याच्या पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये अचानक वाद सुरू झाला.

  • 14 Aug 2026 09:20 AM (IST)

    14 Aug 2026 09:20 AM (IST)

    Pune-Chakan Highway Accident: चाकण एमआयडीसीत खड्ड्यांमुळे आणखी एक भीषण अपघात 

    Pune-Chakan Highway Accident:  राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालला असून सर्वसामान्यांच्या जीवावर उठला आहे. पुणे-नाशिक महामार्ग आणि चाकण एमआयडीसी (MIDC) हद्दीतील तळेगाव-चाकण मार्गावर गुरुवारी एक भीषण अपघात घडला. रस्त्यावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकी स्लिप होऊन अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्याने दोन जणांचा दुर्दैवी अंत झाला. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्याच्या कालावधीत याच मार्गावरील दुरावस्थेमुळे गेलेला हा सहावा बळी ठरला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

  • 14 Aug 2026 09:10 AM (IST)

    14 Aug 2026 09:10 AM (IST)

    Shiv Sena Symbol Case Supreme Court Hearing: "  सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांचा सलग पाचव्या दिवशी जोरदार युक्तिवाद

    Shiv Sena Symbol Case Supreme Court Hearing: शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सलग पाचव्या दिवशी अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयावर गंभीर आक्षेप नोंदवत जोरदार युक्तिवाद केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळ एकनाथ शिंदे गटाला फायदा पोहोचवण्यासाठी आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन निर्णय दिल्याचा थेट आरोप सिब्बल यांनी न्यायालयासमोर केला.

  • 14 Aug 2026 09:00 AM (IST)

    14 Aug 2026 09:00 AM (IST)

    Tamil Nadu Politics:  थलपती विजय आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यातील वाद विकोपाला

    Tamil Nadu Politics:  तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात सध्या तमिळगा वेत्री कळगमचे (TVK) प्रमुख विजय आणि द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यातील तीव्र मतभेद आणि शत्रुत्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही काळापूर्वी एकमेकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असणाऱ्या या दोन नेत्यांमधील राजकीय दरी आता कमालीची रुंदावली असून, हा वाद अगदी वैयक्तिक आणि पोलीस तक्रारींपर्यंत पोहोचला आहे. कावेरी पाण्याच्या मुद्द्यावरून तंजावर येथे आयोजित एका आंदोलनादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी विजय यांच्यावर निशाणा साधला  या भाषणादरम्यान उपस्थितांमधून अभिनेत्री तृषा कृष्णन हिच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या.

  • 14 Aug 2026 08:55 AM (IST)

    14 Aug 2026 08:55 AM (IST)

    Siddhivinayak Temple Accident: प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गंभीर भाजलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

    Siddhivinayak Temple Accident:   मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. मंदिरात अन्न (प्रसाद) बनवताना उकळत्या पाण्याने भरलेला टोप अंगावर पडल्याने एक कंत्राटी कर्मचारी गंभीररीत्या भाजला होता. उपचारादरम्यान या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे मंदिर प्रशासन आणि भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

    सिद्धिविनायक मंदिराच्या स्वयंपाकघरात (किचन) काम सुरू असताना अचानक उकळत्या पाण्याचा मोठा टोप कंत्राटी कर्मचाऱ्याच्या अंगावर उलटला. या भीषण दुर्घटनेत कर्मचारी गंभीररीत्या भाजला गेला होता. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

  • 14 Aug 2026 08:50 AM (IST)

    14 Aug 2026 08:50 AM (IST)

    Uttarakhand Tunnel Incident: चमोलीतील निर्माणाधीन बोगद्यात शिरले पाणी अन् चिखल; १६ मजुरांची सुखरूप सुटका 

    Uttarakhand Tunnel Incident:   उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मायापूर परिसरातील एका निर्माणाधीन बोगद्यात गुरुवारी सायंकाळी अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल घुसल्याने प्रचंड खळबळ उडाली. या घटनेच्या वेळी बोगद्याच्या आत १८ ते १९ मजूर काम करत होते. पाणी आणि चिखलाचा प्रवाह अचानक वाढल्याने मजूर आत अडकले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

  • 14 Aug 2026 08:45 AM (IST)

    14 Aug 2026 08:45 AM (IST)

    Shivsena Supreme Court Hearing: "माझा निर्णय शाश्वत, कोर्टात टिकेल!"; सिब्बल यांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचे प्रत्युत्तर

    Shivsena Supreme Court Hearing:  शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या रंगल्या आहेत. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी वेळेत निर्णय घेतला नाही, असा दावा करत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या आरोपांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  "पीठसीन अधिकारी म्हणून अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे आणि मी कायद्याच्या सर्व तरतुदींचे तंतोतंत पालन केले आहे," असे नार्वेकर यांनी म्हटलं आहे. 

Web Title: 14 august 2026 live breaking news marathi maharashtra politics sports crime national share market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Politics
  • Maharashtra Rain
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.