(फोटो सौजन्य: Pinterest)
मध्य रेल्वे, मुख्य मार्गिका –
कुठे – माटुंगा ते मुलुंड अप व डाऊन धिम्या मार्गावर
कधी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत.
परिणाम – ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धिम्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड येथे थांबून पुढे धिम्या मार्गावर जातील. ठाण्याहून सुटणाऱ्या अप धिम्या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, शीव येथे थांबतील. या सेवा गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
ट्रान्सहार्बर मार्ग
कुठे – ठाणे ते वाशी/नेरुळ अप-डाऊन मार्ग
कधी – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम – ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यानच्या सर्व अप-डाऊन लोकल रद्द राहतील. ठाण्याहून वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४,०७ पर्यंत, तर पनवेल/नेरुळ/वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या सेवा सकाळी १०.२५ ते सायं. ४,०९ पर्यंत रद्द असतील. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
ट्रॅक व सिग्नलिंग दुरुस्तीसाठी मध्यरात्री जम्बो ब्लॉक
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेने शनिवार-रविवारच्या (२७/२८ जून) मध्यरात्री भायंदर व बोरिवली स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा जम्बो ब्लॉक अप व डाऊन फास्ट लाईनवर शनिवार (२७ जून) रात्री ११.३० ते
२७/२८ जूनला पाच तास फास्ट लाईन बंद ठेवणार
रविवार (२८ जून) पहाटे ४.३० या वेळेत पाच तासांसाठी घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत विरार/वसई रोड व बोरिवली दरम्यान धावणाऱ्या सर्व फास्ट लाईन उपनगरी गाड्या स्लो लाईनवरून चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही अप व डाऊन उपनगरी सेवा रद्द राहणार आहेत.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






