Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malhar Conclave 2026: ‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन

Malhar Conclave 2026: ‘प्रतिबिंब : बिहाइंड द बिकमिंग’ या यंदाच्या थीमसह ‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हच्या सत्रांना सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सामाजिक कार्य, सौंदर्य क्षेत्रातील उद्योजकता, राजकारण, नागरी सहभाग आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांवर मान्यवरांनी विचार मांडले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 14, 2026 | 07:20 PM
‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन

‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन

Follow Us
Follow Us:
  • ‘प्रतिबिंब : बिहाइंड द बिकमिंग’ थीममधून नव्या विचारांना दिशा
  • मल्हार २०२६च्या कॉन्क्लेव्हला सुरुवात
  • अन्यायाविरोधातील लढ्यापासून पर्यावरण संवर्धनापर्यंत
  • ‘मल्हार २०२६’च्या पहिल्या दिवशी विविध विषयांवर चर्चा
Malhar Conclave 2026:  ‘प्रतिबिंब : बिहाइंड द बिकमिंग’ या यंदाच्या संकल्पनेवर आधारित ‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हच्या सत्रांना उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवसाच्या विविध सत्रांमध्ये सामाजिक परिवर्तन, धैर्य, उद्योजकता, राजकारणातील नागरिकांचा सहभाग आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली.

‘हू सेज़? शी सेज़’मधून अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा संदेश

कॉन्क्लेव्हच्या पहिल्या सत्राची सुरुवात सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘शी से’च्या संस्थापक त्रिशा शेट्टी यांच्या ‘हू सेज़? शी सेज़’ या सत्राने झाली. त्रिशा शेट्टी यांनी धैर्याच्या विविध पैलूंवर भाष्य करत अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या कथा मांडल्या. अन्याय आणि असमानतेविरोधातील लढ्यात सामूहिक प्रयत्नांची आणि युवा पिढीच्या सहभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अन्याय किंवा अत्याचाराच्या घटनांमध्ये तडजोड करता येणार नाही, हा संदेश या सत्रातून देण्यात आला.

Mumbai News: आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार

‘ब्यूटी टू बिझनेस’मध्ये उद्योजकतेवर चर्चा

यानंतर ‘बी-टू-बी : ब्यूटी टू बिझनेस’ हे सत्र झाले. यामध्ये ‘सिम्पली नाम’च्या संस्थापक नम्रता सोनी आणि ‘फे ब्यूटी’च्या संस्थापक करिश्मा केवलरमानी सहभागी झाल्या. ब्यूटी इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करणे पूर्वी आव्हानात्मक वाटत होते; मात्र आता सौंदर्य क्षेत्र हे दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे, असे दोन्ही उद्योजिकांनी सांगितले. ब्यूटी बिझनेस हा मॅरेथॉनसारखा असून त्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकारण आणि नागरिकांच्या सहभागावर अनीश गवांडे यांचे भाष्य

‘द व्हॉइस ऑफ रीझन’ या तिसऱ्या सत्रात NCP (SP)चे प्रवक्ते आणि झेवियर्सचे माजी विद्यार्थी अनीश गवांडे सहभागी झाले. गवांडे यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा आपला प्रवास आणि त्यांना प्रभावित करणाऱ्या व्यक्ती व विचारांविषयी माहिती दिली. राजकारण्यांसाठी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडील आंदोलनांच्या संदर्भात देशात आपले मत मांडणे हे नेहमीच आव्हानात्मक राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांचा नागरी समाज आणि राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.

पर्यावरणासाठी ‘करेज टू केअर’

दिवसाच्या अखेरच्या सत्राचे नाव ‘करेज टू केअर : व्हेअर पर्पज मीट्स प्रॅक्टिस’ असे होते. या सत्रात ‘बीच प्लीज इंडिया’चे संस्थापक मल्हार कालंबे आणि ‘मिशन ग्रीन मुंबई’चे संस्थापक सुभाजीत मुखर्जी सहभागी झाले. मल्हार कालंबे यांनी भारतातील समुद्रकिनाऱ्यांवरील अस्वच्छता पाहून आपल्याला वाईट वाटले आणि प्रत्यक्ष बदल घडवून आणण्यासाठी काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

सुभाजीत मुखर्जी यांनी पर्यावरणाच्या स्थितीवर भाष्य करताना मागील पिढ्यांनी पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाच्या संवर्धनासमोर मोठी आव्हाने निर्माण केली आहेत, असे मत व्यक्त केले. सत्राच्या शेवटी मुखर्जी यांनी कॉलेजमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे आभार मानत त्यांना भारतीय तिरंगा भेट दिला.

१५ ऑगस्टला पुन्हा रंगणार कॉन्क्लेव्ह

‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्ह १५ ऑगस्ट रोजी पुन्हा नव्या मान्यवरांसह रंगणार आहे. यावेळी FDA कमिश्नर तुकाराम मुंढे आणि बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अली कॉन्क्लेव्हच्या मंचावर सहभागी होणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या सत्रांकडे विद्यार्थी, तरुण आणि विविध क्षेत्रांतील उपस्थितांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Web Title: Malhar 2026 conclave day one inspiration stories reflections behind the becoming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai News
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
3

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
4

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.