Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प

कराड तालुक्यातील गोसावेवाडी येथे उपसरपंच आणि सदस्यांनी शेतरस्ते चर खोदून बंद केल्याने खळबळ उडाली आहे. खरीपाची कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 14, 2026 | 09:43 PM
कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते

Follow Us
Follow Us:
  • कराड तालुक्यात खळबळ!
  • ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते
  • संपूर्ण गाव वेठीस
मसूर: कराड तालुक्यातील गोसावेवाडी येथील मुख्यता गाव कारभार पाहणाऱ्या गावचे उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष यांनीच गावातील प्रमुख शेतरस्ते बंद केल्यामुळे 8 दिवसांपासून खरीप हंगामातील शेतीची कामे खोळंबली आहेत. जनावरांसाठी चारा आणण्यासाठीही लोकांना भटकंती करावी लागत आहे. केवळ दोन लोकांच्या वैयक्तिक हव्यासापोटी संपूर्ण गावाला वेठीस धरण्यात आले आहे

गावातील उपसरपंच, सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी जेसीबीच्या साह्याने चर खोदून रस्ते अडवले आहेत. यामध्ये खिलपाटा रस्ता, इनामात जाणारा रस्ता, शिवारात जाणारा रस्ता, फाटातील रस्ता, भेरुखडी जाणारा रस्ता यासह अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्ते बंद करणाऱ्या लोकांनी केवळ स्वतःच्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्ते खुले ठेवले आहेत. इतर शेतकऱ्यांची मात्र गैरसोय करण्यात आली आहे.

ज्या गावच्या ग्रामस्थांनी गावचा चांगला कारभार सोपवण्यासाठी ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्वाची निवड केली. त्याच ग्रामस्थांना या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याकडून असा अनुभव मिळणे म्हणजे एक दुर्दैव व आश्चर्यचकित मानले जात आहे.ग्रामस्थांना नाहक त्रास देण्यासाठी उपद्वाप करीत असल्याची जोरदार चर्चा हेळगाव विभागात सुरू आहे. प्रशासनाने यात ताबडतोब हस्तक्षेप करून सर्व शेतरस्ते मोकळे करावेत. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

Satara News: कराड पालिकेला भाजपचा ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा; रखडलेल्या विकासकामांवर प्रशासनाला धारेवर

काहीही करू शकत नाही… तलाठ्याचे उत्तर

या संदर्भात ग्रामस्थांनी तलाठी यांच्याशी संपर्क साधला. “मी यात काहीही करू शकत नाही” असे हे बेजबाबदारपणाचे उत्तर मिळाले. असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. वास्तविक हा विषय महसूल खात्याशी संबंधित येतो. या खात्याच्याच महसूल खात्याचा कारभार पाहणाऱ्या तलाठ्याने असे उत्तर देणे म्हणजे अकार्यक्षमपणाचे, बेजबाबदारपणाचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

खायचे दात वेगळे… दाखवायचे वेगळे

आणखी त्यावर एक कढी म्हणजे ज्यांनी रस्ते बंद केले… तेच लोक त्याच दिवशी तहसीलदारांना रस्ते मोकळे करण्याचा घाट घालण्यासाठी तहसीलदारांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले होते. खायचे दात वेगळे… दाखवायचे वेगळे असाच एकंदरीत प्रकार ग्रामस्थांना अनुभवास मिळाला. खरीप हंगामात वेळेवर मशागत, पेरणी, चारा वाहतूक न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा

Web Title: Gram panchayat officers block farm roads with jcb in gosavewadi karad farmers protest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • Farmers
  • Farmers Issue
  • Karad
  • Karad news

संबंधित बातम्या

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक
1

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी
2

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांनो, 24वा हप्ता मिळवायचा असेल तर ही 3 कामं करा; नाहीतर पैशांपासून राहाल वंचित
3

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांनो, 24वा हप्ता मिळवायचा असेल तर ही 3 कामं करा; नाहीतर पैशांपासून राहाल वंचित

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी
4

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.