Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
शासनाने ३० सप्टेंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता, त्यानुसार ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ८ हजार ठोक मानधन आणि २ हजार प्रवास भत्ता असे एकूण १० हजार थेट वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्याचे घोषित करण्यात आले आहे.
मानधन लवकर देण्याविषयी रोहयो मंत्री न यांनी वेळोवेळी आश्वासित केलेले आहे, ते वेळेवर न मिळाल्यामुळे राज्यातील ग्रामरोजगार सेवकांमध्ये न तीव्र असंतोष पसरला आहे म्हणुन ते दिवाळी पूर्वी चेट – खात्यात द्यावे, हिच संघटनेची मागणी आहे.- सुरेश पाटोळे, राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष
३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार दरमहा १० हजार मानधन दिवाळीच्या अगोदर तात्काळ थेट बैंक खात्यात जमा करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. जळगाव यांच्यासह पारोळा तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांना बेमुदत कामबंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आलेले आहे. येत्या ८ दिवसात दिवाळीपूर्वी मागणी मान्य न झाल्यास ग्रामीण भागातील रोहयोची सर्व कामे पूर्णपणे ठप्प करण्याचा इशारा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब तायडे, जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे आणि सर्व तालुकाध्यक्ष यांनी दिला आहे.
मात्र, तब्बल २४ महिने उलटूनही या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. या कामांसाठी विविध जिल्ह्यातील आणि तालुक्यातील प्रवास व अल्पोपहार भत्ता मागणी करून सुद्धा दिलेला जात नाही, यामुळे ग्रामरोजगार सेवकांना वैयक्तिक पदरमोड करून स्वखचनि कामे करावी लागत आहेत. शासनाने सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत ३ ऑक्टोबरच्या जीआर नुसार मानधन वितरीत न केल्यामुळे राज्यव्यापी कामबंद आंदोलन करणेबाबत निवेदन देण्यात आले.
एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद
आहे, या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील रोहयो व विकासकामांवर होणाऱ्या परिणामास शासन व – प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब तायडे, राज्य संघटक खुशाल पाटील, उमेश तायडे, राज्य सल्लागार तथा – जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, जिल्हा सचिव अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिका-यांनी वतीने निवेदन देण्यात आले आहे.






