Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

27 डिसेंबरला ‘या’ मालमत्ता कार्ड वाटप मोहिमेचा महाशुभारंभ; राज्यातील 30 हजार 515 गावातील लोकांना होणार लाभ

30 जिल्ह्यातील सुमारे 30 हजार 515 गावांमधील लोकांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या मालमत्ता कार्डच्या योजनेचा महाशुभारंभ त्या 30 जिह्याच्या ठिकाणी येत्या 27 तारखेला केला जाणार आहे. ही माहिती मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली.

  • By नारायण परब
Updated On: Dec 25, 2024 | 10:03 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठानात आपल्या वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायीक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण स्वामित्व योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यातील सुमारे 30 हजार 515 गावांमधील जनतेच्या आयुष्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग देणाऱ्या स्वामीत्व योजनेचा महाशुभारंभ राज्यातील 30 जिल्ह्याच्या ठिकाणी येत्या 27 तारखेला होत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Manoj Jarange Patil : बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कोण वाचवतंय?, मनोज जरांगेंनी थेट नावच सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील 30 जिल्ह्यांच्या ठिकाणी हा महाशुभारंभ होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती राहील. या मालमत्ता कार्डाच्या महावाटप शुभारंभास प्रधानमंत्री मोदी यांचे प्रमुख मार्गदर्शन असल्याचे म्हणाले.

अनेक गावात जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद-विवाद होतात. जमिनीच्या कागदपत्रांबद्दल अनेकांना परिपूर्ण माहिती नसते. काही गावात इतरांच्या जमिनीवर कब्जा सारखे प्रकार होतो. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासह अधिक पारदर्शकतेच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण आहे.

येत्या 27 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागपूरसह राज्यातील 30 जिल्ह्यांच्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीमुळे गावकर्‍यांना हक्काचे मालमत्ता कार्ड प्राप्त होईल

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीमुळे गावकर्‍यांना हक्काचे मालमत्ता कार्ड प्राप्त होईल. घरकर्जासारखी सुविधा मिळण्यासाठी हे मालमत्ता कार्ड महत्त्वाचा दस्तऐवज राहील. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना घरासाठी, तरुणांना व्यवसाय व सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.गावातील जमिनीचे योग्य पद्धतीने मोजमाप झाल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणार्‍या कराची आकारणी उत्तम प्रकारे मिळणार आहे. तसेच ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढणार आहे. यामुळे गावातील विकास कामांना गती मिळेल असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

‘स्वामित्व’ योजना

केंद्र सरकारकडून स्वामित्व योजना ही राष्ट्रीय पंचायत दिन 24 एप्रिल 2020 रोजी सुरू करण्यात आली आहे. ही योजना लागू करण्यासाठी पंचायती राज मंत्रालय हे नोडल मंत्रालय आहे. महसूल/भुलेख विभाग हे राज्यांतील योजनेसाठी नोडल विभाग आहेत. यामध्ये ड्रोनद्वारे मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडिया ही नोडल एजन्सी आहे. ड्रोन सर्वेक्षण तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील जमिनीचे सीमांकन करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यामुळे ग्रामीण भागातील घरांच्या मालकांच्या मालकी हक्काची नोंद तयार होईल. बँकांकडून कर्ज घेण्याव्यतिरिक्त, तो इतर कारणांसाठी देखील वापरू शकतो.

Pune Crime News: दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Web Title: Grand launch of property card distribution campaign giving land ownership rights on 27th december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 10:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • narendra modi
  • Property Card

संबंधित बातम्या

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार
1

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?
2

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?

महाराष्ट्रात फार्मसीच्या तृतीयांश जागा रिक्त! गुणवत्तेचा अभाव, कालबाह्य अभ्यासक्रम आणि अव्यवस्थित प्रवेश प्रक्रियेची मोठी समस्या
3

महाराष्ट्रात फार्मसीच्या तृतीयांश जागा रिक्त! गुणवत्तेचा अभाव, कालबाह्य अभ्यासक्रम आणि अव्यवस्थित प्रवेश प्रक्रियेची मोठी समस्या

India Poverty Reduction : भारत लवकरच ‘गरिबी’ला करणार रामराम! २४८ दशलक्ष भारतीय गरिबीतून पडले बाहेर
4

India Poverty Reduction : भारत लवकरच ‘गरिबी’ला करणार रामराम! २४८ दशलक्ष भारतीय गरिबीतून पडले बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.