Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers News: आखाती तणावाचा फटका शेतीला; सिंचन साहित्यांच्या दरात झपाट्याने वाढ

आंतरराष्ट्रीय तणाव आणि आखाती संघर्षाचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसू लागला असून, सिंचनासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 19, 2026 | 07:04 PM
आखाती तणावाचा फटका शेतीला; सिंचन साहित्यांच्या दरात झपाट्याने वाढ

आखाती तणावाचा फटका शेतीला; सिंचन साहित्यांच्या दरात झपाट्याने वाढ

Follow Us
Follow Us:

सोलापूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि आखाती संघर्षाचा थेट परिणाम आता ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांच्या किमतीत अचानक झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले असून शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

गेल्या दोन आठवड्यांतच सिंचनाशी संबंधित साहित्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. पीव्हीसी पाइप, ड्रिप इरिगेशन संच, विविध व्हॉल्व्ह, इलेक्ट्रिक पंप आणि मोटारी यांसारख्या उपकरणांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामागे कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि पुरवठ्यातील अडथळे कारणीभूत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Solapur News : करवाढीशिवाय १४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता; सभागृहात एकमत, शासनाकडे प्रस्ताव होणार दाखल

विशेषतः प्लास्टिक आणि रासायनिक घटकांच्या दरवाढीमुळे सिंचन साहित्य निर्मितीचा खर्च वाढला आहे. काही भागात पीव्हीसी पाइपच्या किमतीत तब्बल ५० ते ६० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, तर ड्रिप इरिगेशन आणि संबंधित साहित्य २० ते ३० टक्क्यांनी महागले आहे. कृषीपंपांच्या दरातही टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे.

दरम्यान, मल्चिंग पेपरच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात त्याची टंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध मालही वाढीव दराने विकला जात आहे. शेतीसाठी आवश्यक रसायनांच्या आयातीत अडथळे निर्माण झाल्याने त्यांचे दर दुप्पट होण्याच्या मार्गावर आहेत. काही प्रकारची रसायने तर बाजारात उपलब्धच नसल्याचे चित्र आहे.

खत-औषधांच्या दरवाढीने खर्च वाढला

शेती औषधे आणि खतांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. द्रवरूप औषधांचा तुटवडा जाणवत असून उपलब्ध औषधांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. पावडर स्वरूपातील औषधांमध्येही लक्षणीय दरवाढ झाली आहे. परिणामी, एकूण शेती खर्चात मोठी वाढ झाली आहे.

नियोजन विस्कळीत, चिंता वाढली

पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना वेळेवर साहित्य मिळत नसल्याने पिकांच्या नियोजनावर परिणाम होत आहे. पाण्याचे व्यवस्थापन आणि पिकांची निगा राखणे कठीण झाले आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शासन हस्तक्षेपाची गरज

सध्याच्या परिस्थितीत शेती टिकवणे हेच मोठे आव्हान बनले आहे. वाढत्या खर्चामुळे नफा कमी होत असून काही शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने दर नियंत्रण, अनुदान आणि आवश्यक साहित्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

Mira Bhayander : शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपचा ‘जनता दरबार ; मेहता-सरनाईक संघर्ष शिगेला

Web Title: Gulf conflict impact farming irrigation equipment price rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • agriculture
  • Farming
  • india

संबंधित बातम्या

MSP For Rabi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारने सहा रब्बी पिकांचे एमएसपी वाढवले
1

MSP For Rabi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारने सहा रब्बी पिकांचे एमएसपी वाढवले

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळावर केंद्रीय कृषीमंत्री अॅक्शन मोडवर, ‘या’ दिवशी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार
2

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळावर केंद्रीय कृषीमंत्री अॅक्शन मोडवर, ‘या’ दिवशी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
3

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
4

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.