Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नसरापूरमध्ये अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या’; वाईकरांची मागणी

समस्त वाईकर नागरिकांच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीने यापूर्वीही अशी अमानवी कृत्य केलेली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 06, 2026 | 09:05 AM
'नसरापूरमध्ये अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या'; वाईकरांची मागणी

'नसरापूरमध्ये अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या'; वाईकरांची मागणी

Follow Us
Follow Us:

वाई : नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानवीय अत्याचार व निर्दयी खूनप्रकरणी संपूर्ण वाई शहरात संतापाची लाट उसळली आहे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी वाईकर एकत्र येऊन तहसीलदार सोनाली मेटकरी व पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. तसेच त्वरित शिक्षेची अमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

समस्त वाईकर नागरिकांच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीने यापूर्वीही अशी अमानवी कृत्य केलेली आहेत. मात्र, पुराव्याअभावी त्याला शिक्षा झाली नाही आणि त्याचाच गैरफायदा घेत पुन्हा त्याने हे क्रूर कृत्य केले. ही बाब अत्यंत संतापजनक व समाजासाठी धोकादायक असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. समस्त वाईकर नागरिकांची ठाम मागणी आहे की असे अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशा प्रकरणांची जलदगती न्यायालयांत सुनावणी करून त्वरित निकाल द्यावा.

याशिवाय, अल्पवयीन मुली, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करण्यात यावेत. तसेच, नसरापूर प्रकरणातील आरोपीस लवकरात लवकर मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. समस्त वाईकर नागरिकांच्या तीव्र भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी वाईकारांनी निषेध मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला आहे.

महागणपती घाटावरून मोर्चाला सुरुवात

वाईच्या महागणपती घाटावरून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तसेच वाईच्या किसनवीर चौकात मानवी साखळी तयार करून काही काळ रस्ता रोको करण्यात आला. त्यानंतर मोर्चा पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन वाई पोलिसांना निवेदन दिले गेले. त्यानंतर तहसीलदार सोनाली मेटकरी यांनाही निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदनावर नगराध्यक्ष अनिल सावंत, काशिनाथ शेलार चरण गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, देवानंद शेलार स्वप्निल भिलारे, शुभदा नागपूरकर, डॉ. अस्मिता जैन, डॉ. जागृती पोरे, तनुजा मालुसरे, अपर्णा जमदाडे, ज्योती गांधी, केतकी पाटणे, दीपाली सावंत, प्रीती वखारकर, माया अभ्यंगकर, रश्मी शेवडे, विजय ढेकाणे, संतोष जमदाडे, सचिन सावंत, प्रशांत नागपूरकर, अजित वनारसे अमित वनारसे, सुनील साठे, अमित सोहनी, प्रा.समीर पवार, गिरीश जाधव यांच्या सह्या आहेत.

Mahabaleshwar : ‘आपले सरकार’ पोर्टलवर महाबळेश्वरचा उल्लेखच नाही! तक्रार निवारण प्रणालीतील त्रुटींमुळे नागरिक आणि पर्यटक संतप्त

Web Title: Hang the accused who committed the inhumane act in nasrapur demand by the people of wai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • crime news
  • Nasrapur Case
  • Wai News

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.