सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. दिग्गज अभिनेत्यानं वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोव्यामध्ये नाना पाटेकरांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद व मनाला वेदना देणारी आहे. उत्कृष्ट अभिनय, सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नाना पाटेकर सदैव आपल्या स्मरणात राहतील. नाना पाटेकर यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असं सपकाळ म्हणाले.
नाना पाटेकर यांच्या निधनावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून नाटक व चित्रपटांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी नाटक, चित्रपट व त्यानंतर हिंदी चित्रपटातूनही त्यांनी काम केले. पुरुष व हमीदाबाईची कोठी या नाटकात साकारलेल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. क्रांतीवीर, परिंदा, तिरंगा, वेलकम, प्रहार, सिंहासन, नटसम्राट, देऊळ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. नाना पाटेकर यांनी अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी भरीव आर्थिक मदत केली तसेच जलसंधारणाची कामेही केली आहेत.
नाना पाटेकर यांच्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले पण त्यांचा अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कारकीर्द व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम पाहता ते खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र भूषण’ आहेत असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हे सुद्धा वाचा : तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार






