Sanjay Gaikwad
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक शनिवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला नगराध्यक्ष पूजा गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश जाधव, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, नायब तहसीलदार अशोक हिवाळे, गटशिक्षणाधिकारी दीपक येरमुले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, बुलढाणा व मोताळा तालुक्यांतील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ( Buldhana News)
Satara News : माण तालुक्यात चारा छावण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर! बिजवडीत २३ नोव्हेंबरला रास्ता रोको
या बैठकीत आमदार आणि अधिकाऱ्यांकडून ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांचा तसेच आरोग्यविषयक विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण, आरोग्य संस्थांमधील उपलब्ध सुविधा, माता व बाल आरोग्य, नियमित लसीकरण, असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, नागरिकांची आरोग्य तपासणी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी नियोजन करून योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच आरोग्य सेवा देताना नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याची आवश्यकता व्यक्त केली.
आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागासह सर्व संबंधित शासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे बैठकीत नमूद करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Ans: आमदार संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक झाली.
Ans: आरोग्य सुविधा, माता-बाल आरोग्य, लसीकरण आणि शासकीय आरोग्य योजनांवर चर्चा झाली.
Ans: नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.






