Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळात रोटी गावाला मोठा दिलासा; जनाई शिरसाई योजनेचे पाणी अखेर तलावात दाखल

दौंड तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत असलेल्या रोटी गावच्या तलावात अखेर जनाई शिरसाई योजनेच्या प्रकल्पातून पाणी पोहोचले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2026 | 06:49 PM
दुष्काळात रोटी गावाला मोठा दिलासा; जनाई शिरसाई योजनेचे पाणी अखेर तलावात दाखल

दुष्काळात रोटी गावाला मोठा दिलासा; जनाई शिरसाई योजनेचे पाणी अखेर तलावात दाखल

Follow Us
Follow Us:
  • रोटी तलावात जनाई शिरसाई योजनेचे पाणी दाखल
  • ग्रामस्थ आणि युवकांच्या प्रयत्नांना यश
  • १० ते १२ दिवस अखंडित पाणी सोडण्याची मागणी
पाटस : दौंड तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत असलेल्या रोटी गावच्या तलावात अखेर जनाई शिरसाई योजनेच्या प्रकल्पातून पाणी पोहोचले आहे. ऐन दुष्काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने तो तात्पुरता का होईना सुटल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील अनेक दिवसांपासून रोटी परिसरात पाणी टंचाई भासत होती. शेतपिके आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने आणि तलावातील पाणी साठा संपुष्टात आल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती.

रोटी गावच्या तलावात पाणी सोडण्यात यावे यासाठी ग्रामस्थ मागील काही दिवसांपासून पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करीत होते. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार राहुल कुल यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. अखेर खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल यांनी दखल घेत जनाई शिरसाई योजनेच्या माध्यमातून पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते. दरम्यान, ग्रामस्थांनी लोकवर्गणी आणि गावातील युवकांनी घेतलेले अहोरात्र कष्ट यामुळे पाण्याचा प्रवास तलावापर्यंत पोहोचला आहे.

रोटी गावच्या तलावापर्यंत पाणी पोहोचविण्याच्या मार्गात कालव्याची गळती ही मोठी अडचण ठरत होती. ही समस्या दूर करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी गळतीच्या ठिकाणी प्लास्टिक आच्छादन (लायनिंग) उपलब्ध करून दिले. कालवा दुरुस्तीच्या कामासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावला. तर गावातील युवकांनी पाणी तलावापर्यंत पोहोचेपर्यंत सातत्याने मेहनत आणि पाठपुरावा केला.

हे सुद्धा वाचा : लाखो रुपयांची सक्शन कम जेटिंग मशीन धूळखात; दौंड नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे अखेर तलावात पाणी दाखल झाले आहे. मात्र तलावात पुरेसा पाणीसाठा निर्माण होण्यासाठी आणि गावाची पाण्याची गरज भागविण्यासाठी कालव्यातून किमान १० ते १२ दिवस सलग पाणी सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि संबंधित प्रशासनाने रोटी गावच्या पाण्याच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील १० ते १२ दिवस अखंडित पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तलावात पाणी दाखल झाल्याने समाधान व्यक्त केले असून मे महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा तलावात उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोटी गावच्या तलावात पाणी कुठून सोडण्यात आले?

    Ans: जनाई शिरसाई योजनेच्या प्रकल्पातून रोटी गावच्या तलावात पाणी पोहोचले आहे.

  • Que: तलावात पाणी पोहोचविण्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात आले?

    Ans: कालव्याच्या गळतीच्या ठिकाणी प्लास्टिक आच्छादन (लायनिंग) करण्यात आले. ग्रामस्थांनी लोकवर्गणी दिली, तर गावातील युवकांनी अहोरात्र मेहनत आणि पाठपुरावा केला.

  • Que: रोटी गावची पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामस्थांची मागणी काय आहे?

    Ans: तलावात पुरेसा पाणीसाठा निर्माण होण्यासाठी पुढील १० ते १२ दिवस कालव्यातून अखंडित पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

Web Title: Water from the janai shirsai project has reached the roti lake nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Daund
  • Farmers
  • water issues

संबंधित बातम्या

Ujani Dam: माणूस आणि जनावरे तहानेने व्याकूळ; धारशिवला उजनी तारणार; ‘इतके’ पाणी मिळणार?
1

Ujani Dam: माणूस आणि जनावरे तहानेने व्याकूळ; धारशिवला उजनी तारणार; ‘इतके’ पाणी मिळणार?

भरमसाट मजुरीदराला लगाम, ओतूरमध्ये कांदा लागवडीसाठी नवे दर निश्चित; नियम मोडल्यास…
2

भरमसाट मजुरीदराला लगाम, ओतूरमध्ये कांदा लागवडीसाठी नवे दर निश्चित; नियम मोडल्यास…

लाखो रुपयांची सक्शन कम जेटिंग मशीन धूळखात; दौंड नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
3

लाखो रुपयांची सक्शन कम जेटिंग मशीन धूळखात; दौंड नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Dharashiv News: १५५ कामांची पडताळणी होऊनही संशय कायम! ‘नाम फाउंडेशन’च्या कामांवर योजनेचा निधी खर्च केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
4

Dharashiv News: १५५ कामांची पडताळणी होऊनही संशय कायम! ‘नाम फाउंडेशन’च्या कामांवर योजनेचा निधी खर्च केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.