Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : राज्याचे “पार्किंग ” धोरण लवकर आणणारं, प्रताप सरनाईक यांची माहिती

एकात्मिक पार्किंग धोरण आणण्या अगोदर त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये या समस्याने उग्र रूप धारण केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 19, 2025 | 07:07 PM
राज्याचे "पार्किंग " धोरण लवकर आणणारं, प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्याचे "पार्किंग " धोरण लवकर आणणारं, प्रताप सरनाईक यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी “एकात्मिक पार्किंग धोरण “आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये(MMRDA) करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते या संदर्भात बोलावलेल्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव ( परिवहन) संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह एम.एम.आर.डी.ए. मधील सर्व महापालिकाआयुक्त उपस्थित होते.

गोकुळचे उकळलेले दूध मुंबईत थंड होणार; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाचा निर्णय?

मंत्री सरनाईक म्हणाले, एकात्मिक पार्किंग धोरण आणण्या अगोदर त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये या समस्याने उग्र रूप धारण केले आहे, त्या महापालिका आयुक्तांच्या सूचना, अभिप्राय यांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून देणे गरजेचे असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रामध्ये अशा पार्किंग जागा विकसित करण्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्यासाठी पार्किंग धोरण तयार करत असताना सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा मध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये प्रभावीपणे राबवावे असे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले आहे, त्यानुसार ही बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये पार्किंगच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच अभिप्राय यांचा येणाऱ्या पार्किंग धोरणामध्ये समावेश केला जाईल असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने रचना करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे . तसेच रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व मोटार परिवहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी. रस्त्यावर अनेक वर्ष बंद असलेली वाहने तातडीने टोईंग करून हलवण्यात यावीत, रस्ते मोकळे करावेत. तसेच विकास आणि सुविधा साठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर महापालिकांनी स्विकारावी जेणेकरून भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईल.

Raigad News : विजेच्या धक्क्याने तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Web Title: He state parking policy will be brought in soon information from pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 07:07 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Bus Fare Hike : एसटी बसचा प्रवास महागणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितलं…
1

ST Bus Fare Hike : एसटी बसचा प्रवास महागणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितलं…

St Bus News : एसटीसमोरील आर्थिक संकट गडद! राजस्थानप्रमाणे करसवलत द्या; डिझेल दरवाढीवरून एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी
2

St Bus News : एसटीसमोरील आर्थिक संकट गडद! राजस्थानप्रमाणे करसवलत द्या; डिझेल दरवाढीवरून एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

Pratap Sarnaik: खासगी बसच्या मनमानी भाडेवाढीवर सरकारचा लगाम; प्रताप सरनाईकांकडून विशेष समिती गठित
3

Pratap Sarnaik: खासगी बसच्या मनमानी भाडेवाढीवर सरकारचा लगाम; प्रताप सरनाईकांकडून विशेष समिती गठित

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी
4

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.