Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी

एसटी महामंडळातील बस दुरुस्तीसाठी वापरले जाणारे जुने ट्रॉली जॅक कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. जॅक सटकून आतापर्यंत चार यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत नवीन ट्रॉली जॅक आणि बॉटल-टाइप जॅकची तातडीने खरेदी करण्याची मागणी सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 01, 2026 | 03:27 PM
एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत 'मृत्यूचा सापळा'; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी (फोटो सौजन्य-ChatGPT)

एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत 'मृत्यूचा सापळा'; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • एसटीत मृत्यूचा सापळा ठरत आहेत जुने ट्रॉली जॅक
  • जॅक सटकून आतापर्यंत चार यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेक कर्मचारी जखमी
  • नवीन ट्रॉली जॅक तातडीने खरेदी करण्याची श्रीरंग बरगे यांची मागणी
मुंबई : एसटी महामंडळातील बसांच्या दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीमध्ये वापरले जाणारे ट्रॉली जॅक हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण असले, तरी अनेक वर्षांपासून नवीन जॅकची खरेदी न झाल्याने यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुने आणि निकामी ट्रॉली जॅक वापरताना वारंवार अपघात होत असून आतापर्यंत चार यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

राज्यभरात एसटी महामंडळात सुमारे १५ हजार २०० यांत्रिकी कर्मचारी कार्यरत असून बसांची दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत नवीन ट्रॉली जॅक खरेदी करण्यात आलेले नाहीत. सततच्या वापरामुळे बहुतांश जॅक जीर्ण व निकामी झाले असून ते कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत.

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा

पूर्वीच्या एसटी बसचे वजन तुलनेने कमी होते. मात्र, सध्या महामंडळाच्या ताफ्यात अधिक वजनाच्या आधुनिक बसांचा समावेश झाल्याने जुन्या ट्रॉली जॅकवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू असताना जॅक सटकण्याच्या घटना वाढल्या असून अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या राज्यभरात किमान ३५० ट्रॉली जॅकची आवश्यकता असताना एसटीकडे केवळ सुमारे ४० ट्रॉली जॅक (२० टन क्षमतेचे) उपलब्ध आहेत. याशिवाय सुमारे चार हजार बॉटल-टाइप जॅक वापरात आहेत. मात्र, वाढत्या ब्रेकडाऊनच्या घटना, जुन्या बसांची संख्या आणि देखभाल-दुरुस्तीवरील वाढता ताण लक्षात घेता उपलब्ध उपकरणे अपुरी पडत असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मृत्यूचा सापळा ठरत असलेले जुने ट्रॉली जॅक तातडीने भंगारात काढावेत आणि अत्याधुनिक क्षमतेचे नवीन ट्रॉली जॅक तसेच बॉटल-टाइप जॅक खरेदी करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही त्यांनी एसटी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

Pratap Sarnaik : भाडेवाढीनंतरही एसटी तोट्यात; ‘महिनाभरात उत्पन्न वाढवा, अन्यथा…’, प्रताप सरनाईक यांचा एक महिन्याचा अल्टिमेटम

Web Title: Msrtc old trolley jacks safety concerns mechanical staff demand new equipment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus
  • ST Employees

संबंधित बातम्या

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी
1

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी
2

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

MSRTC Smart Card : 1 सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य; पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन
3

MSRTC Smart Card : 1 सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य; पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ११ ऑगस्टला ८६ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन
4

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ११ ऑगस्टला ८६ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.