Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले : वाचा सविस्तर

मंकीपॉक्स हा दक्षिण आफ्रिकेतून आलेला आजार आहे. आज इंग्लंड व अमेरिका या देशांमध्येसुद्धा मंकीपॉक्सचे काही रुग्ण आढळले आहेत. परंतु आपल्या देशात मंकीपॉक्सची एकही केस अद्याप आढळलेली नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2022 | 10:55 PM
मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले : वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जागतिक स्तरावर, कोरोना महामारीने ग्रासलेल्या लोकांना आता मंकीपॉक्स नावाच्या आजाराची भीती वाटत आहे. WHO ने आत्तापर्यंत कॅनडा, स्पेन, इस्रायल, फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह डझनभर देशांमध्ये मंकीपॉक्सची 90 हून अधिक प्रकरणे नोंदवली आहेत. याची लागण झालेल्या लोकांना पाहून प्रत्येकाच्या मनात भीती वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले? 

मंकीपॉक्स हा दक्षिण आफ्रिकेतून आलेला आजार आहे. आज इंग्लंड व अमेरिका या देशांमध्येसुद्धा मंकीपॉक्सचे काही रुग्ण आढळले आहेत. परंतु आपल्या देशात मंकीपॉक्सची एकही केस अद्याप आढळलेली नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

मंकीपॉक्स हा विषाणू हवेतून प्रसारित होत नाही. ह्युमन टू ह्युमन टच किंवा ॲनिमल टू ह्युमन टच अशा माध्यमांतूनच तो पसरतो. पुरळ येणे, ताप येणे अशी या विषाणूची लक्षणे आहेत. चार आठवड्यांपर्यत या विषाणूचा संसर्ग राहू शकतो. या विषाणूचा मृत्यू दर १ टक्क्यांपासून ते १० टक्क्यांपर्यंत असू शकतो, असे अहवालातून सांगण्यात आले आहे. एक-दोन दिवस ताप आणि पुरळ येण्याच्या दरम्यान या आजाराचा संसर्ग दुसऱ्यांना होण्याची शक्यता असते, असे राजेश टोपे यांनी सांगितले. एकही रुग्ण आपल्या येथे आढळलेला नाही, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

[read_also content=”राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण https://www.navarashtra.com/maharashtra/ncp-office-bearer-beaten-by-bjp-workers-nrdm-284907.html”]

तसेच ज्या देशात या आजाराचे रूग्ण आढळले आहेत त्या देशातून येणाऱ्या लोकांचे विमानतळावर स्क्रिनिंग सुरू केले आहे. या स्क्रिनिंगच्या माध्यमातून या आजाराची लक्षणे एखाद्या व्यक्तीस आढळल्यास त्या व्यक्तीचे स्वॉब घेऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला पाठवत आहोत. कस्तुरबा गांधी रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आरक्षित ठेवला आहे. डॉक्टरांची नेमणूक केली आहे. या आजाराशी लढण्याची निश्चितच तयारी ठेवली आहे. जिल्ह्याजिल्ह्यामध्ये याबाबात जनजागृती केली जात असून सतर्कता म्हणून ही माहिती महाराष्ट्राच्या जनतेला दिली असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

Web Title: Health minister rajesh topes big statement about monkey pox disease what exactly did he say read more nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2022 | 10:55 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA
  • rajesh tope

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
2

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
3

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
4

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.