Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पश्चिम घाटात ऊर्जा प्रकल्प नकोच! मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुनील गोगटे यांची मोठी मागणी

भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. या पत्रात पश्चिम घाट समूहात कोणत्याही प्रकारची हायड्रॉलिक ऊर्जा प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 18, 2026 | 03:07 PM
Raigad News: पश्चिम घाटात ऊर्जा प्रकल्प नकोच! मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुनील गोगटे यांची मोठी मागणी

Raigad News: पश्चिम घाटात ऊर्जा प्रकल्प नकोच! मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुनील गोगटे यांची मोठी मागणी

Follow Us
Follow Us:
  • सुनील गोगटे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
  • पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात असलेले वनक्षेत्र व नैसर्गिक अधिवासाचा मोठ्या प्रमाणावर नाश होण्याची शक्यता
  • प्रकल्पांमुळे जंगलक्षेत्र, नैसर्गिक अधिवास, डोंगररांगा, जलप्रवाह व जैवविविधतेवर परिणाम होण्याची गंभीर शक्यता
कर्जत: कर्जत तालुक्यातील सह्याद्री आणि पश्चिम घाट समूहात कोणत्याही प्रकारची हायड्रॉलिक ऊर्जा प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे यांनी ही मागणी केली. पर्यावरणाचा अभ्यास करून येथील जैव विविधता आणि निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी महत्वाची असून पश्चिम घाट समूहात कोणतेही ऊर्जा प्रकल्प नको, अशी त्यांची मागणी आहे.

Yavatmal News: दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने २७ जुलै २०२६ रोजी पश्चिम घाट पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेचा अभ्यास केला आहे. पश्चिम घाट हा देशाच्या पर्यावरणीय सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, समृद्ध व संवेदनशील प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये घनदाट जंगले, विविध प्रकारच्या वनस्पती, दुर्मिळ वनौषधी, असंख्य पक्षी, वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी तसेच स्थानिक व संकटग्रस्त जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते.

पश्चिम घाट हा अनेक नद्यांच्या उगमाचा प्रदेश असून संपूर्ण पर्यावरणीय संतुलन व जलसुरक्षेसाठी त्याचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात विविध धरण, जलविद्युत व पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित असून काही प्रकल्पांच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. अशा प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र, नैसर्गिक अधिवास, डोंगररांगा, जलप्रवाह व जैवविविधतेवर परिणाम होण्याची गंभीर शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

मोठ्या प्रमाणावरील जंगलतोडीची शक्यता

पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात असलेले वनक्षेत्र व नैसर्गिक अधिवासाचा मोठ्या प्रमाणावर नाश होण्याची शक्यता टोरंट सारख्या विनाशकारी प्रकल्प यांच्यामुळे होऊ शकतो. धरणे, जलाशय, बोगदे, प्रवेशमार्ग, वीजवाहिन्या, सबस्टेशन, पंप्ड स्टोरेज प्रकल्प व इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होण्याची शक्यता आहे. सातत्याने होणारी बांधकामांमुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक स्थलांतर मार्गामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.

वनौषधींच्या नाशाचा धोका

हायड्रॉलिक पॉवर प्रकल्पामुळे दुर्मिळ वनस्पती आणि वनौषधीच्या नाशाचा धोका निर्माण झाला आहे. पश्चिम घाटातील जंगलांमध्ये अनेक स्थानिक, दुर्मिळ व औषधी वनस्पती आढळतात. टोरंट प्रकल्प होणाऱ्या पेज नदीचे पर्यावरणीय आरोग्य, नदीतील जैवविविधता, मासेमारी, शेती व स्थानिक पाणीपुरवठा यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रभावित ग्रामसभा, स्थानिक नागरिक, पर्यावरण तज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक व जैवविविधता तज्ज्ञ यांचा अर्थपूर्ण सहभाग घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला अतिम मंजुरी देऊ नये, अशी मागणीही होत आहे.

Mumbai News: गोवंडीचा RMC प्लाण्ट होणार बंद! सर्व पक्षांच्या १३ नगरसेवकांचा विरोध; प्रदूषणामुळे टीबी रुग्णांमध्ये वाढ

पुनर्विचार करणे गरजेचे !

पश्चिम घाटातील घनदाट जंगले, जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास, वनौषधी आणि नैसर्गिक जलप्रणाली कायमस्वरूपी धोक्यात येणार असेल, तर अशा विकासाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. पश्चिम घाट हा केवळ आजच्या पिढीचा नाही, तर भावी पिढवांचा नैसर्गिक वारसा आहे. त्यामुळे रायगड व पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील विविध धरण व जलविद्युत प्रकल्पांच्या एकत्रित पर्यावरणीय परिणामांचा सखोल, स्वतंत्र व वैज्ञानिक अभ्यास झाल्यानंतर अशा प्रकल्प यांना मान्यता द्यावी. रायगड व पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील सर्व प्रस्तावित धरण, जलविद्युत व पंप्ड स्टोरेज प्रकल्पांचा एकत्रित संचयी पर्यावरणीय परिणाम अभ्यास करण्यात यावा.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Sunil gogte urges cm devendra fadnavis to deny hydropower projects permission in the western ghats hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
1

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट 13,816 रुपयांचा बोनस, कोणाला होणार फायदा?
2

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट 13,816 रुपयांचा बोनस, कोणाला होणार फायदा?

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन
3

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन

Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला
4

Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.