Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावती घटनेने आरोग्य यंत्रणा अलर्ट! रुग्णालयातील उपारणांची तपासणी; अग्नीशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण

अमरावतीमध्ये स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांमधील सुरक्षा यंत्रणा आणि विद्युत साहित्याची तपासणी केली.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2026 | 11:30 AM
अमरावती घटनेने आरोग्य यंत्रणा अलर्ट! रुग्णालयातील उपारणांची तपासणी; अग्नीशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण

अमरावती घटनेने आरोग्य यंत्रणा अलर्ट! रुग्णालयातील उपारणांची तपासणी; अग्नीशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण

Follow Us
Follow Us:

अमरावती येथील स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांमधील सुरक्षा यंत्रणा आणि विद्युत साहित्याची मंगळवारी (दि.२५) तपासणी करण्यात आली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणा प्रभावीपणे हाताळता यावी, यासाठी डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा रक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.(फोटो सौजन्य – AI)

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले

अमरावती येथील स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेत तीन नवजात बालकांना जीव गमवावा लागला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजनांची पाहणी केली.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके, अग्निशमन विभागाचे अधिकारी विनोद खरात तसेच संबंधित विभागांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत नवजात शिशू अतिदक्षता विभागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या वेळी तेथील विद्युत साहित्य, व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणांची पाहणी करण्यात आली. तसेच एनआयसीयू, आयसीयू आणि जनरल वॉर्डमधील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे की नाही, याचीही तपासणी करण्यात आली.

रुग्णालयात अचानक आग लागणे किंवा विद्युत उपकरणामध्ये बिघाड होण्यासारखी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर कसा करावा, आग लागल्यास सुरुवातीच्या काही मिनिटांत कोणती पावले उचलावीत आणि रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर कसे हलवावे, याचे प्रात्यक्षिक अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी करून दाखविले.

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत

नर्सेस, सुरक्षा रक्षक, आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने विद्युत सुरक्षेला विशेष महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वैद्यकीय उपकरणांची नियमित तपासणी, विद्युत यंत्रणेची देखभाल आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण देण्यात आले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Health system on alert following the amravati incident inspection of hospital equipment and training on handling fire extinguishers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Amaravati
  • amaravati news
  • Hospital News

संबंधित बातम्या

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच
1

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?
2

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.