Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heatstroke Cases : राज्यात उष्णतेचा कहर सुरूच; दोन महिन्यांत उष्माघाताचे 6 बळी

अहिल्यानगरमधील २, तर अकोला, लातूर आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ८६ रुग्णांची नोंद झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 12, 2026 | 09:47 AM
उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

Follow Us
Follow Us:

मुंबई : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढताना दिसत आहे. महाराष्ट्रात यंदा कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. १ मार्च ते ९ मे या कालावधीत राज्यभरात उष्माघाताचे एकूण २३६ रुग्ण आढळले आहेत. तसेच, उष्माघाताच्या संशयास्पद कारणांमुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे.

९ मे पर्यंत नोंदवलेल्या ६ संशयास्पद मृत्यूंपैकी लातूरमधील एकाचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित ५ प्रकरणांची वैद्यकीय तपासणी अद्याप सुरू आहे. यामध्ये अहिल्यानगरमधील २, तर अकोला, लातूर आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ८६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातही उष्णतेशी संबंधित लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, डिहायड्रेशन (पाणी कमी होणे), थकवा, उलट्या आणि डोकेदुखी अशा तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Weather Alert Apps : अचानक बदलतंय हवामान! चिंता सोडा, आत्ताच डाऊनलोड करा हे अ‍ॅप… क्षणोक्षणी मिळणार लाईव्ह अलर्ट्स

राष्ट्रीय हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रम अंतर्गत राज्य सरकार २०१९ पासून उष्माघाताचा जिल्हानिहाय डेटा गोळा करत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यापासून राज्यात दीर्घकाळ उष्णतेची लाट कायम आहे, ज्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे.

नाशिकमध्ये तापमान चाळिशी पार

यंदाच्या हंगामात २५ एप्रिल रोजी ४१.५ अंश तापमानाची उचांकी नोंद झाली होती. तो विक्रम अवघ्या १५ दिवसांत मोडीत निघाला आहे. गेल्या २४ तासात कमाल तापमानात १.४ अंशाची वाढ नोंदविली गेली आहे. पारा चाळिशीपार राहिल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजल्यापासूनच उन्हाच्या असह्य झळा बसण्यास सुरुवात झाली.

कडाक्याच्या उन्हामुळे अनेक रस्ते ओस

सूर्याची किरणे थेट अंगावर आल्याने उन्हाचे तीव्र चटके सहन सोसावे लागले. दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्ते ओस पडल्याचे पाहायला मिळाले. मुख्य बाजारपेठामध्ये शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडताना दिसले नाही.

Web Title: Heatwave continues to wreak havoc in the state 6 heatstroke deaths in two months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Climate Change
  • Weather Update

संबंधित बातम्या

Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी
1

Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; शहरात अनेक ठिकाणी बरसल्या जोरदार सरी

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन; पुणे जिल्ह्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
2

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन; पुणे जिल्ह्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…
3

Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…

Maharashtra Rain Alert: सावधान! 48 तास धोक्याचे? कोकणात पाऊस आक्रमक होणार, तर…
4

Maharashtra Rain Alert: सावधान! 48 तास धोक्याचे? कोकणात पाऊस आक्रमक होणार, तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.