Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; गेल्या 24 तासांत पावसाची झाली ‘इतकी’ मोठी नोंद

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर (Rain in Satara) कायम असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात नवजा येथे सर्वाधिक 92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठा 12.90 टीएमसी झाला होता. त्याचबरोबर धरणात 9000 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 02, 2023 | 07:12 AM
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; गेल्या 24 तासांत पावसाची झाली ‘इतकी’ मोठी नोंद
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर (Rain in Satara) कायम असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात नवजा येथे सर्वाधिक 92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठा 12.90 टीएमसी झाला होता. त्याचबरोबर धरणात 9000 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला तरीही मागील सात दिवसापासून जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता पश्चिमेकडे सर्वदूर पाऊस पोहोचला आहे. कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वरसह कांदा टी कोयना खोऱ्यातील नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. या भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात कोयनानगर येथे 59 मिलिमीटर तर नवजाला 92 महाबळेश्वर येथे 85 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या महिन्याभरात कोयनेला 463 नवजाला 631 तर सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला 808 मिलिमीटर झाला आहे. पश्चिम भागातील धोम, बलकवडी कण्हेर तारळी, कोयना धरण क्षेत्रात कमी अधिक फरकाने पाऊस सुरू आहे. कोयना क्षेत्रात पाऊस अधिक होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सात दिवसात जवळपास अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे धरणात शनिवारी सकाळच्या सुमारास 9291 पाण्याची आवक होत होती. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस असला तरी पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणी रखडले असून, काही ठिकाणी पाणीटंचाईची सावट आहे. येत्या काही दिवसात पाऊस वाढल्यास खरिपाची पेरणी होऊ शकते. नाहीतर शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सातारा शहरात सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून साताऱ्यात जोरदार सरी तासभर कोसळल्या. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांची चांगलीच अडचण झाली.

Web Title: Heavy rain in satara but some parts of satara rain not sufficient nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2023 | 07:12 AM

Topics:  

  • Koyna Dam
  • maharashtra
  • Satara News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.