Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tomato Price Hike: महागाईचा फटका! टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये

टोमॅटोच्या किमती अचानक पुन्हा वाढल्या आहेत. ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील खर्च वाढला आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात झाली विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. ५० हजार टोमॅटोची सध्यस्थितीत येथे आवक आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 09, 2025 | 03:41 PM
महागाईचा फटका! टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये

महागाईचा फटका! टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये

Follow Us
Close
Follow Us:
  • टोमॅटोच्या किमतीत पुन्हा वाढ
  • ५० हजार टोमॅटोची सध्यस्थितीत येथे आवक
  • शेतकऱ्यांना आता टोमॅटो पिकाचाच केवळ आधार
प्रविण दोशी । नाशिक : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर अचानक गगनाला भिडले आहेत. एक महिन्यापूर्वीपर्यंत टोमॅटो प्रत्येक घरातील ताटातला एक महत्त्वाचा भाग होता, मात्र आता सर्वसामान्य नागरिक विकत घेण्यापूर्वी विचार करत आहेत. पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे, ज्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर झाला आहे. अनेक शहरांमध्ये किमती दुप्पट झाल्या आहेत, ज्यामुळे स्वयंपाकघरातील खर्च वाढला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रमुख उत्पादक राज्यांपासून ते दिल्लीसारख्या प्रमुख बाजारपेठांपर्यंत, सर्वत्र टोमॅटोचे दर वाढत आहेत. त्यावर, लग्नाच्या हंगामात वाढत्या मागणीमुळे किमती आणखी वाढल्या आहेत. सध्या, लोक आवश्यकतेनुसार कमी खरेदी करत आहेत, येत्या काही दिवसांत बाजार सामान्य होईल अशी आशा आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण आणि हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता टोमॅटो पिकाचाच केवळ आधार ठरला आहे.

अरे देवा! टोमॅटो 600 रुपये किलो, किमतीत 400 टक्क्यांनी वाढ, 5000 कंटेनर अडकल्यामुळे पुरवठा निम्म्यावर

दिंडोरी तालुक्यात परतीच्या अवकाळी व बेमोसमी पावसामुळे विविध पिकांची वाताहात झाली आहे. भरपाईच्या मागणीबाबत सर्वच स्तरावरुन पाठपुरावा सुरु आहे. तालुक्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे, भात, नागली, वरई ही पिकेही धोक्यात आली आहेत. टोमॅटो पिकाचेही नुकसान झालेच आहे, मात्र तुलनात्मक कमी असले तरी सध्या टोमॅटोला असलेले दर हे बऱ्यापैकी असल्याने टोमॅटो उत्पादकांना तेवढाच आधार आता उरला आहे. प्रतवारी व दर्जानुसार उत्पादकांना टोमॅटो मिळतो आहे.

टोमॅटोची आवक वाढल्याने आर्थिक उलाढालीस वेग

दरम्यान, वणी-सापुतारा रस्त्यावरील बाजार समितीच्या उपबाजारात व खोरीफाटा भागात टोमॅटो खरेदी विक्री केंद्र सुरु झाले आहे. सध्यस्थितीत येथे सुमारे ५० हजार क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील व्यापारी टोमॅटो खरेदीचे व्यवहार करत आहेत. प्रतवारी, पॅकींग करून ट्रकमध्ये टोमॅटो टाकण्याचे काम परप्रांतीय कामगार करतात. व्यापाऱ्यांनी हे कामगार सोबतच आणले आहेत. तसेच स्थानिक व्यापारीही टोमॅटो खरेदी करुन परराज्यात पाठवित आहेत. प्रतिदीवशी सुमारे २५ टूक टमाटा परराज्यात विक्रीसाठी जात आहे, अशी माहिती टोमॅटो व्यापाऱ्यांनी दिली. मोठी आर्थिक उलाढाल यानिमित्ताने होते
आहे. टमाटा खरेदी विक्री व्यवहार प्रणालीमुळे वणी-सापुतारा रस्त्याला यात्रेचे स्वरुप आले आहे. ट्रॅक्टर, पिकअप, जीप, छोटा हत्ती अशा विविध वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, सध्यस्थितीत टोमॅटोला मिळणाऱ्या दरामुळे उत्पादकांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

पावसाळ्यात झाले नुकसान, तरीही पीक जगविण्यासाठी कष्ट

दिंडोरी तालुक्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानतर दुबार लागवड करण्यात आली होती. पावसाच्या तडाख्यात काही उत्पादकांचे नुकसान झाले. मात्र, तरीही अशा प्रसंगाला सामोरे जाऊन बहुतांशी उत्पादकांनी हे पीक जगविण्यासाठी आर्थिक अतिरिक्त भार सोसला आहे.

काय सांगता काय? दिल्लीत टॉमेटोचा भाव 80 रूपये, मात्र सरकारचा जनता भाव ठरतोय वरचढ; केवळ 52 रुपयात…

💡

Frequently Asked Questions

  • Que: टोमॅटोचा दर कोणत्या महिन्यात जास्त असतो?

    Ans: बहुतेक कापणी डिसेंबर ते मार्च महिन्यांत होते आणि त्यामुळे टोमॅटोचे भाव कमी असतात तर जुलै-नोव्हेंबर महिन्यांत सामान्य उत्पादन वर्षात ते वाढते.

  • Que: टोमॅटोचे भाव का वाढत आहेत?

    Ans: टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, अतिवृष्टीमुळे पुरवठा कमी झाल्यामुळे गेल्या महिन्यात किरकोळ किमती २५% ते १००% वाढल्या आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या प्रमुख पुरवठा क्षेत्रांमध्ये घाऊक किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

  • Que: टोमॅटो खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

    Ans: टोमॅटो खरेदी करण्याचा सर्वोत्तम काळ जुलै ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत असतो. पिकलेल्या, गोड आणि चविष्ट टोमॅटोसाठी ऑगस्ट हा उत्तम काळ असल्याचे शेफ बर्गामिनी यांनी सुचवले आहे.

Web Title: Heavy rainfall caused extensive damage to various crops and tomatoes 50 rupees per kilo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Crime: नाशिकमध्ये मातृत्वाची विक्री? 14 मुलांची आई मुलं विकत असल्याचा खुलासा; एकाला १० हजारात, तर…
1

Nashik Crime: नाशिकमध्ये मातृत्वाची विक्री? 14 मुलांची आई मुलं विकत असल्याचा खुलासा; एकाला १० हजारात, तर…

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना
2

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका
3

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा
4

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.