Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rain Updates: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; कुठे दरड कोसळली, कुठे पाणी साचलं? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व अपडेट्स

Heavy Rain Updates: राज्यभरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील अनेक भाग प्रभावित झाले आहे. कुठे दरड कोसळल्याची घटना घडली आहे तर कुठे पूर आला आहे. तर ठाण्यात होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रातील पावसाचे सविस्तर अपडेट्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 06, 2026 | 09:06 AM
Rain Updates: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; कुठे दरड कोसळली, कुठे पाणी साचलं? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व अपडेट्स

Rain Updates: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; कुठे दरड कोसळली, कुठे पाणी साचलं? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व अपडेट्स

Follow Us
Follow Us:
  • रायगड, कर्जत आणि कशेडी घाटात पूर व दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
  • मुंबई–पुणे एक्स्प्रेस हायवे, मिसिंग लिंक आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली.
  • ठाणे, मीरा-भाईंदर आणि नालासोपारा येथे वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग, पत्रे आणि झाड कोसळण्याच्या घटना घडल्या.
Maharashtra Rain Updates: राज्यभरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता नागरिकांच्या जीवनावर होत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाली आहे. काही भागात पूर आला आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे कुठे काय परिणाम झाला आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने, रेड अलर्ट जारी

कुंडलिका नदीला पूर

रायगडमधील कुंडलिका नादीला पूर आला असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात पाणी शिरलं असून रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते बंद झाल्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी अडकले आहेत.

मिसिंग लिंकवर दरड कोसळली

मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्या समोर मोठी दरड कोसळली असून पुढील आदेश येईपर्यंत मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

ठाण्यात होर्डिंग कोसळलं

ठाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भलं मोठं लोखंडी होर्डिंग रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील पोखरण नंबर 2 परिसरात ही घटमा घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

कशेडी घाटात नव्या महामार्गावर मोठी दरड; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीसह मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने महामार्गावरील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. घटनेनंतर पोलीस, महामार्ग प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव व रस्ता साफसफाईचे काम सुरू केले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवरून दरड कोसळण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना आणि प्रवाशांना अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.

एक्स्प्रेस हायवेवर पाण्याचा फटका; फूड मॉलजवळ दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे एक्स्प्रेस हायवेवरील फूड मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे एक्स्प्रेस हायवेवरील फूड मॉल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने या ठिकाणी दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. परिणामी मुंबईकडे आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाणी ओसरल्यानंतर आणि रस्त्याची पाहणी पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Navi Mumbai News: वाशीत गीता अपार्टमेंटच्या सज्ज्याचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

उल्हास नदीला पूर

रायगडच्या कर्जतमधील उल्हास नदीला पूर आला आहे. उल्हास नदी किनाऱ्यावरील बेंडसे आणि वावे पूल पाण्याखाली गेले आहे. पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

मेट्रो-९ स्थानकावरील पत्रे उडाले

मीरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या तुफानी पावसामुळे मेट्रो-९ प्रकल्पातील दीपक हॉस्पिटलसमोरील मेडतिया मेट्रो स्थानकावर गंभीर प्रकार घडला. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे स्थानकावरील काही पत्रे (शीट्स) उडाल्याची घटना समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणत्याही वाहनाचे किंवा नागरिकांचे नुकसान झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानकावरील सुरक्षा उपाययोजना आणि बांधकामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

घरावर भलं मोठे झाड कोसळलं

नालासोपारा पूर्वेकडील वाकनपाडा परिसरात घरावर भलं मोठे झाड कोसळलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून झाड हटविण्याचे काम सुरू आहे. हे धोकादायक झाड तोडण्यासाठी पालिकेला वारंवार तक्रार केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हे झाड घरावर कोसळले, असा आरोप घरमालकीण महिलेने केला आहे.

Web Title: Heavy rains disrupt life across maharashtra floods landslides and traffic chaos hit several areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Rain
  • Rain Update

संबंधित बातम्या

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
1

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
2

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
3

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.