Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jagbudi River Flood: रत्नागिरीत मुसळधार पाऊस; खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने ७.३० मीटरवर वाहत धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहरात पूर येण्यास सुरुवात झाली असून पुढील ४८ तास रत्नागिरीसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 05, 2026 | 06:59 PM
रत्नागिरीत मुसळधार पाऊस; खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरीत मुसळधार पाऊस
  • खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
  • बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत असून, जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे खेड शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळी ११ वाजता भरणे नाका पुलाजवळ जगबुडी नदीची पाणीपातळी ७.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली. नदीची इशारा पातळी ५.०० मीटर, तर धोक्याची पातळी ७.०० मीटर आहे. त्यामुळे नदी धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत असून प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

वाढत्या पाणीपातळीचा परिणाम आता शहरातही दिसू लागला असून खेड शहरातील मटण मार्केट परिसरात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. पाणी हळूहळू वाढत असल्याने व्यापारी व स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील आणखी काही सखल भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर वाहू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच खेड–खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Karjat Rains Alert: कर्जतमध्ये पावसाचा हाहाकार! २४ तासांत २९१ मिमी पावसाची नोंद, उल्हास नदीला पूर; तर ३० हून अधिक…

पूराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील स्मशानभूमी तसेच काही वीटभट्ट्याही पाण्याखाली गेल्या आहेत. काही गावांचा संपर्क धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, पुराच्या पाण्यातून प्रवास करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

तसेच आवश्यकता भासल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश

Web Title: Ratnagiri khed heavy rain jagbudi river crosses danger level flood water enters market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Khed
  • mansoon
  • Rains in Ratnagiri

संबंधित बातम्या

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
1

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.