Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugarcane FRP : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊसाची FRP एकरकमी देण्याचे हायकोर्टाचे आदेश; जुना निर्णय रद्द

शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपीची रक्कम देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रक्कमीच द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 17, 2025 | 08:46 PM
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊसाची FRP एकरकमी देण्याचे हायकोर्टाचे आदेश; जुना निर्णय रद्द

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊसाची FRP एकरकमी देण्याचे हायकोर्टाचे आदेश; जुना निर्णय रद्द

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून आता शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपीची रक्कम देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रक्कमीच द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्य शासनाचा यासंदर्भातला आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. मात्र, आता न्यायालयाने शासनाचा हा निर्णय रद्द ठरवला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारा आणि कारखानदारांना दिलासा देणार निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरुद्ध शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भातील याचिकेवर आज न्यायालायत सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजुने निर्णय देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार असताना तुकड्या तुकड्याने एफआरपी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे एफआरपी देण्याच्या पद्धतीत जो बदल केला होता तो निर्णय आम्ही पूर्ववत करून सगळ्या साखर कारखानदारांना चारी मुंड्या चीत केलेले आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी हायकोर्टाच्या निर्णयानंतर म्हटलं. कारखानदारांच्या दबावाला बळी पडून मविआ सरकारने तुकड्या तुकड्याने एफआरपी देण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता, असेही शेट्टी यांनी म्हटले. दरम्यान, राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफ.आर.पी चा कायदा पूर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. राज्य सरकारचा 21-2-2022 चा शासन निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी माध्यमांशी बोलत होते.

Web Title: High court order to maharashtra govt give sugarcane frp lump sum amount to farmers old decision reject after raju shetti petition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Raju Shetti
  • Sugarcane Farmers

संबंधित बातम्या

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
1

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.