Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय

वसई पूर्वेकडील नायगावच्या टिवरी परिसरात तब्बल १००० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रे आणि कायदेशीररित्या रद्द झालेल्या मुखपत्राचा आधार घेत फिर्यादीची ६५.३३ एकर जमीन हडपल्या आरोप आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 06, 2026 | 03:18 PM
मोठी बातमी ! महायुती सरकारमधील 'या' बड्या मंत्र्याच्या अडचणींत होणार वाढ; कोट्यवधींच्या घोटाळ्याचा केला गेला आरोप

मोठी बातमी ! महायुती सरकारमधील 'या' बड्या मंत्र्याच्या अडचणींत होणार वाढ; कोट्यवधींच्या घोटाळ्याचा केला गेला आरोप

Follow Us
Follow Us:
  • वसईत १ हजार कोटींचा जमीन घोटाळा उघड
  • हायप्रोफाईल बिल्डरांचा सहभाग असल्याचा संशय
  • संबधित तहसीलदार, तलाठ्यांविरुद्ध तक्रार दाखल
 

Vasai Land Scam: वसई पूर्वेकडील नायगावच्या टिवरी परिसरात तब्बल १००० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रे आणि कायदेशीररित्या रद्द झालेल्या मुखपत्राचा आधार घेत फिर्यादीची ६५.३३ एकर जमीन हडपल्या प्रकरणी विकासक हेमंत पाटील आणि धर्मेश शहासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींनी संगनमत करून सरकारी नियमांना हरताळ फासला असून, महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने जमिनीचे फेरफार स्वतःच्या कंपन्यांच्या नावे करून घेतल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर नायगाव पोलिसांनी या फसवणुकीची गंभीर दखल घेत ‘बीएनएस’च्या विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. या हायप्रोफाईल घोटाळ्याचे धागेदोरे मोठे असण्याची शक्यता असून सहायक पोलीस निरीक्षक विलास कुटे अधिक तपास करत आहेत.

Vasai Virar Municipal Election: वसई-विरार महापालिकेत राजकीय खळबळ; १६ नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी

बिल्डर शंकर बोरकर यांनी फिर्यादी दिलेल्या फिर्यादीवरून हेमंत पाटील, धर्मेश शहा, दीपक खोचरे, मच्छिंद्र भोईर यांच्यासह अन्य काही संशयित आरोपीनी वसई पूर्वेकडील नायगाव टिवरी येथील कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून विविध कंपन्यांच्या नावे खरेदीखत तयार केले. त्यानंतर या बनावट खरेदीपत्राच्या आधारे वसई उपनिबंधक नोंदणी कार्यालय वसई-२ मध्ये नोंदणी करून जमीन बेकायदेशीरपणे हस्तांतर करून घेतली. याप्रकरणात निबंधक नोंदणी कार्यालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी नोंदणी अधिनियम कलम ३२,३३ ची काटेकोरपणे अंमलबजावणी न करता नमूद आरोपींना सहाय्य होईल, असे कृत्य केले.

तसेच या जमीनींच्या सातबारा उतारा सदरी नोंद करतेवेळी तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांनी महसुली नियमांची पायमल्ली करून जमीन आरोपींच्या नावे करण्यास मदत केल्याचीही तक्रार बोरकर यांनी केली आहे. त्यामुळे याप्रकरणात आता संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. आरोपींनी जमीन खरेदी करण्यासाठी शंकर बोरकर यांच्या बँक खात्याच्या दिलेल्या रकमेचे धनादेश जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना देऊन त्यांच्यापैकी जवळपास ९० एकर जमिनीचे खरेदीखत करून जमीन लाटून एक हजार कोटी रुपयांची फसवणुक केल्याची तक्रार बोरकर यांनी केली आहे.

Vasai Fishing Boat Incident: गूढ वर्तुळामुळे मच्छिमारांमध्ये भीती! वसई समुद्रात अचानक नेमकं काय घडलं?

या तक्रारीची चौकशी मीरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने केली. त्या चौकशीत बोरकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य आढळून आल्यानंतर नायगाव पोलिस ठाण्यात हेमंत पाटील, धर्मेश शाह, दीपक खोचरे, मच्छिंद्र भोईर यांच्यासह काही आरोपींविरोधात नायगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक करत असून गुन्ह्यातील रकमेची व्याप्ती पाहता हा गुन्हा ईडीकडे वर्ग होण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: High profile land fraud accused of usurping 65 acres of land through forged documents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • fraud
  • palghar
  • property
  • vasai

संबंधित बातम्या

शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Palghar FDA Action : पालघरमध्ये FDA चं ‘ऑपरेशन क्लिन’! 1 कोटी 37 लाखांचा बनावट अन्नसाठा सील, 5 परवाने निलंबित, गुटख्यावरही कारवाई
2

Palghar FDA Action : पालघरमध्ये FDA चं ‘ऑपरेशन क्लिन’! 1 कोटी 37 लाखांचा बनावट अन्नसाठा सील, 5 परवाने निलंबित, गुटख्यावरही कारवाई

Mumbai News: अरे देवा! नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही…; इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत नवा वाद, कारवाईची मागणी
3

Mumbai News: अरे देवा! नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही…; इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत नवा वाद, कारवाईची मागणी

Railway Porter Loot : कुलींची दादागिरी… प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये, तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय
4

Railway Porter Loot : कुलींची दादागिरी… प्रवाशाकडून उकळले तब्बल 4700 रुपये, तक्रार होताच रेल्वेने घेतला कठोर निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.