Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vishalgad Fort: हायकोर्टाचा बकरी ईदनिमित्त ‘हा’ निर्णय, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; विशाळगडावरील वातावरण तापणार?

ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला असून, अखेर कोर्टाच्या सूचनेनुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2025 | 05:00 PM
Vishalgad Fort: हायकोर्टाचा बकरी ईदनिमित्त ‘हा’ निर्णय, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; विशाळगडावरील वातावरण तापणार?
Follow Us
Close
Follow Us:
कोल्हापूर: ऐतिहासिक विशाळगडावरील दर्ग्यावर उच्च न्यायालयाने कुर्बानीला परवानगी दिली असल्याने या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून न्यायालयाच्या निकालाचा निषेध केला आहे.  विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यावर बकरी ईद आणि उरुस करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच काही नियम व अटी पाडून प्राण्यांची कुर्बानी देण्यात न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

दरम्यान आता विशाळगडच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून रस्त्यावर उतरले आहेत.  विशाळगडावरील उरुसाला कायमस्वरूपी बंदी घाला अशी मागणी केली असून न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे.

विशाळगडावर मलिक रेहान यांचा दर्गा आहे. येथे बकरी ईद आणि उरूस साजरा केला जातो. यासाठी  कुरबानी म्हणून बकऱ्याचा बळी दिला जातो. मात्र विशाळगड हा संरक्षित स्मारकाचे यादीत असल्याने येथे प्राणी, पक्षांचा बळी देऊ नये असा आदेश राज्य पुरातत्व विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद यांनी वेळोवेळी नोटीस बजावून दिले होते. याच्या विरोधात मलिक रेहान दर्गा ट्रस्ट यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याला आता न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती नीला के. गोखले, न्यायमूर्ती फिरदोस्पी पूनावाला ,यांच्यासमोर ही सुनावणी झाली. याचीका कत्यातर्फे सतीश बी. तळेकर आणि माधवी आयप्पन यांनी युक्तिवाद केला.
विशाळगडावर ‘अतिक्रमण हटाव’ माेहिम

ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला असून, अखेर कोर्टाच्या सूचनेनुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. गडावरील पुरातन वारसा जपण्यासाठी आणि कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

Vishalgad Fort: विशाळगडावर ‘अतिक्रमण हटाव’ माेहिम; कोर्टाच्या सूचनेनुसार पोलिस बंदाेबस्तात कारवाई सुरू

गेल्या वर्षी १४ जुलै रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यातून विशाळगडाशेजारी दंगल झाली. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गडासह परिसरात संचारबंदी लागू केली होती. विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयाने पुरातत्त्व विभागाची सुनावणी घेऊन अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्याचे निर्देशित केले होते.

विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार गेल्या वर्षभरात वारंवार पुढे आली होती. या भागात असणारा दर्गा जुना असल्याने ते अतिक्रमण नाही, असे मुस्लीम संघटनांचे म्हणणे होते. अतिक्रमणासंबंधात गेल्या वर्षी १४ जुलैला ‘चलो विशाळगड’ अशी हाक शिवप्रेमींंना आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना देण्यात अाली होती. त्यानंतर विशाळगडाच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला हिंसक वळण लागले होते.

Vishalgad Curfew : शिवरायांचा हा किल्ला तब्बल सहा महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला; तहीही या असणार अटी

अतिक्रमणमुक्त विशाळगडाच्या मोहिमेला गेल्या वर्षी हिंसक वळण लागल्यानंतर आता विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. कोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद बराच जूना आहे.

Web Title: Hindutva organizations aggressive against the high courts decision to offer kurbani at vishalgad dargah kolhapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Vishalgad encroachment
  • Vishalgad Fort

संबंधित बातम्या

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका
1

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी
2

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी

‘औंदा ह्यो पाऊस…’, शेतकऱ्यांच्या वेदनांचा कडवा हुंकार; कवी बाबा पवारांचा सडेतोड प्रहार
3

‘औंदा ह्यो पाऊस…’, शेतकऱ्यांच्या वेदनांचा कडवा हुंकार; कवी बाबा पवारांचा सडेतोड प्रहार

श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरील अतिक्रमणे हटवली जाणार; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश
4

श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरील अतिक्रमणे हटवली जाणार; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.