विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहीम (फोटो - सोशल मिडिया)
कोल्हापूर: ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला असून, अखेर कोर्टाच्या सूचनेनुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. गडावरील पुरातन वारसा जपण्यासाठी आणि कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.
गेल्या वर्षी १४ जुलै रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यातून विशाळगडाशेजारी दंगल झाली. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गडासह परिसरात संचारबंदी लागू केली होती. विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयाने पुरातत्त्व विभागाची सुनावणी घेऊन अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्याचे निर्देशित केले होते.
Vishalgad Curfew : शिवरायांचा हा किल्ला तब्बल सहा महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला; तहीही या असणार अटी
विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार गेल्या वर्षभरात वारंवार पुढे आली होती. या भागात असणारा दर्गा जुना असल्याने ते अतिक्रमण नाही, असे मुस्लीम संघटनांचे म्हणणे होते. अतिक्रमणासंबंधात गेल्या वर्षी १४ जुलैला ‘चलो विशाळगड’ अशी हाक शिवप्रेमींंना आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना देण्यात अाली होती. त्यानंतर विशाळगडाच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला हिंसक वळण लागले होते.
अतिक्रमणमुक्त विशाळगडाच्या मोहिमेला गेल्या वर्षी हिंसक वळण लागल्यानंतर आता विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. कोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद बराच जूना आहे.
कारवाईला न्यायालयात आव्हान
गेल्या वर्षी विशाळगडाच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत हिंसाचार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ जुलैपासून अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली. चार दिवस ही कारवाई सुरू होती. या कारवाईत गडावरील ९४ अतिक्रमणे प्रशासनाने, तर नागरिकांनी स्वतःहून १० अतिक्रमणे हटवली. काही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने पावसाळा संपेपर्यंत निवासी अतिक्रमणे काढू नका, त्यानंतर कारवाई करा, असे आदेश दिले होते.
पुरातन वारसा जपण्यासाठी पावले
ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला असून, अखेर कोर्टाच्या सूचनेनुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. गडावरील पुरातन वारसा जपण्यासाठी आणि कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.
Nitesh Rane On Vishalgad: “विशाळगडावर उरूस भरवून हिंदू…”; नितेश राणेंची आक्रमक भूमिका
नागरिकांनी उठवला होता आवाज
विशाळगड आणि पायथ्याशी १५८ अतिक्रमणे आहेत. ती काढण्यासाठी राज्य शासनाने निधीही वर्ग केला हेाता. पण काही बेकायदेशीर बांधकामे अद्यापही हटवलेली नव्हती. आजही या भागात अनेकांची दुकाने, घरे आणि छोटे व्यवसाय उभारले आहेत. यावर स्थानिक नागरिकांनी यावर आवाज उठवला होता. अखेर, या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने स्पष्ट निर्देश देत, गडावरील अतिक्रमण तातडीने हटवावे, असे आदेश दिले. त्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे