रवींद्र वायकरांना अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वायकर यांच्यात काल रात्री अडीच वाजेपर्यंत चर्चा झाली. ही चर्चा संपल्यानंतर रवींद्र वायकर ठाण्यातून निघाले. त्यानंतर सकाळी अखेर रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले. बैठकीनंतर वायकारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. याच मतदार संघातून रवींद्र वायकर यांची लढत ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यासोबत असणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर यांच्या मागे ईडी चौकशी लावण्यात आली होती. मात्र ईडी चौकशी चालू असताना रवींद्र वायकर यांना उमेदवारी कशी मिळाली असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना? रवींद्र वायकर काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यात गेले होते.त्यांच्या भेटीनंतर दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या बैठकीनंतर रवींद्र वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्बत करण्यात आला. वायकर रात्री अडीच वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या घरातून बाहेर गेले. त्यानंतर सकाळी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशी लढत होणार असल्याने आगामी काळात कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
वायकर म्हणजे काम हा ब्रँड
रवींद्र वायकर म्हणाले, नवीन उमेदवाराला प्रचार करण्यासाठी वेळ लागतो. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये चार वेळा नगरसेवक झालो आहे. आरोग्य, शिक्षण अशी मी जनतेची अनेक काम केली. वायकर म्हणजे काम हा ब्रँड झाला आहे. चार वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार अशी जनतेची आवरत सेवा करत होतो. माझा प्रचार ३५ वर्षांपासून होत आहे, असे रवींद्र वायकर म्हणाले.
१९७४ पासून मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करत आहे. राजकारणामध्ये कधीही बदल होतो. कोण कोणाचे कधी मित्र होतील आणि कोण कोणाचे कधी शत्रू होतील हे सांगता येत नाही. दिल्ली हे माझं स्वप्न नव्हतं. महाराष्ट्र हे माझे स्वप्न होते. जे घडेल ते विधीलिखीत असणार आहे.मी युद्धात जिकंण्याच्या उद्देशाने उतरतो. मी कधीच अपयश पाहिलेले नाही. महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणार आहे. काम करणारा प्रतिनिधी आहे. भाजपची पूर्ण साथ मिळणार आहे.